जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more

डॉक्टराचे घर फोडून तब्बल 100 तोळे सोने अन् 10 लाखाची रोकड लंपास; कर्फ्युच्या पहिल्याच रात्री घडली घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | डॉक्टराचे घर फोडून चोरट्यांनी घरातील शंभर तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोग असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज पहाटे शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. कर्फ्यू च्या पहिल्याच रात्री अशा प्रकारे पोलिसांना आव्हान देत धाडसी चोरी घडल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत. डॉ.सुषमा सोनी … Read more

खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद | मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथील एमआयएमचे मा.खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते. मागील दोन-तीन दिवसापासून त्यांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट घेतली असता त्यांना कोरोना असल्याचे कळाले. इम्तियाज जलील यांनी ही माहिती स्वतः ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्यांनी कोविड टेस्ट घ्या असे … Read more

कोरोना लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यूने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढल्या नंतर संकट वाढलं आहे. दरम्यान आता औरंगाबाद येथे कोरोनाची लस घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. औरंगाबादेतील एका पोलिसांनं आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या पोलिसाला अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, … Read more

मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी; रोडरोमियोची भररस्त्यात दादागिरी

औरंगाबाद प्रतिनिधी | मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहारतील एमआयडीसी वाळूज परिसरात घडला. रोडरोमियोची भररस्त्यात सुरु असणारी दादागिरी पाहून नागरिकांनी मध्यस्ती करुन सदर वाद मिटवला. याप्रकरणी घटनेतील आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. एमआयडीसी परिसरातील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पायी जात असताना मुलीच्या … Read more

एकाच आरोपीकडून दिवसभरात सलग दोन चेन स्नॅचिंग; घटना CCTV कॅमऱ्यात कैद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांना थांबवण्यासाठी औरंगाबाद मध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने दावा केला होता की यामुळे गुन्हेगारी कमी होईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. आज शहरात 2 ठिकाणी राजाबाजार आणि सिडको परिसरामध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग आणि गळ्यातील गंठण चोरीचा … Read more

हा तालुका माझ्या आई – बापाने मोठ्या कष्टाने उभा केलाय; इथे तुमचे झेंडे लागू देणार नाही

औरंगाबाद | कन्नड हा तालुका माझे वडील स्व. रायभान जाधव व मातोश्री तेजस्विनी जाधव यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला तालुका आहे या ठिकाणी तुमच्या सारख्यांचे झेंडे लागू देणार नाही, असा इशारा देत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन जाधव हे जेल मधुन सुटून आल्यावर काल एका … Read more

पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कारवाई

औरंगाबाद प्रतिनिधी | 17 तारखेला चिखलठाणा पोलिस स्टेशन येथे चितेगाव शिवारातील बीपीसीएल पेट्रोल पंपावरून 3 लाख 45 रुपये किमतीचे 3480 लिटर डिझेल कोणीतरी चोरट्याने पळवले असा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळून 12 जणांना पकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस आणून 98 लाख … Read more

पत्नीची हत्या करून लिपिक पसार; कौटुंबिक कलह की अजून काही याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी | व्यायाम करण्याच्या डंबेल्सने आणि कपडे धुण्याच्या दगडाने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिसादेवी या गावात उघडकीस आली. कविता सिध्देश त्रिवेदी असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सिध्देश गंगाशंकर त्रिवेदी असे मारेकरी पतीचे नाव आहे. दरम्यान, कविता त्रिवेदीची हत्या कौटुंबिक कलहातून झाली … Read more