खासदार जलील यांच्या सांगण्यावरून मनपाने शेजाऱ्याचे अनधिकृत बांधकाम पाडल्याची चर्चा

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाशेजारी सुरू असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण पथकाच्या वतीने काढण्यात आले. पूर्व नोटीस देऊन देखील संबंधितांनी खुलासा न केल्याने बांधकाम काढण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र खासदार जलील यांच्या संगण्यावरूनच ही कारवाई झाल्याची खमंग चर्चा शहरभर सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जलील यांच्या कार्यालयाला खेटूनच मतीन खान … Read more

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा छातीत चाकू भोसकून खून; औरंगाबाद शहरात खळबळ

औरंगाबाद | पूर्ववैमनस्यातून एका तरुणाने उभ्या चौघांवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय पत्रकारच जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंगूरी बाग परिसरात घडली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सय्यद … Read more

दिलासादायक! लवकरच घाटी रुग्णालयातील रिक्तपदे भरणा; मंत्री अमित देशमुख यांची माहिती

औरंगाबाद | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (घाटी) वर्ग-1 ते वर्ग-4 ची मंजूर पदे भरण्याची कार्यवाही सुरू होणार असून ही पदे लवकरच भरली जातील असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. या संदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी दि.8 मार्च रोजी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग-1 ते वर्ग-4 … Read more

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या महाभागांकडून मनपाने केला 60 हजाराचा दंड वसूल

औरंगाबाद । मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मनपाने ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे या साठी देखील सदर दंड आकारण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख जाधव यांच्या नेतृत्वात पथक कर्मचाऱ्यांनी … Read more

उन्हाळा सुट्टीतही सुरु राहणार शाळा; मे महिन्यात दोन तासांचे वर्ग

सोलापूर | दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र, कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन टिचिंग … Read more

जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

सातवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन संपविले जीवन; परिसरात हळहळ

औरंगाबाद | आई वडील कामावर गेल्यावर सातवीत शिकणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री आनंदनगर गरखेडा परिसरात उघडकीस आली.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संजीवनी उर्फ दीपाली एकनाथ घेणे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संजीवनी ही … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more

डॉक्टराचे घर फोडून तब्बल 100 तोळे सोने अन् 10 लाखाची रोकड लंपास; कर्फ्युच्या पहिल्याच रात्री घडली घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | डॉक्टराचे घर फोडून चोरट्यांनी घरातील शंभर तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोग असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल चोरल्याची घटना आज पहाटे शहरातील प्रताप नगर भागात उघडकीस आली. कर्फ्यू च्या पहिल्याच रात्री अशा प्रकारे पोलिसांना आव्हान देत धाडसी चोरी घडल्याने पोलिसांच्या रात्र गस्तीवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होत. डॉ.सुषमा सोनी … Read more

अहमदनगरचे नावं बदलून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर” करा; भूषणसिंह राजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  तिकडे उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केलं.त्यानंतर महाराष्ट्रात देखील औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा किंवा उस्मानाबादचे धाराशिव करा या मागण्या जोर धरू लागल्या होत्या. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे आले म्हणजे हमखास औरंगाबाद आता संभाजीनगर होईल अशी शक्यता नामांतर वाद्यांना वाटू लागली होती. पण नुकतीच अजून एका जिल्ह्याचे नाव … Read more