‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
दिल्ली येथे एका तरूणाने जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबाराच्या घटनेवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ”सत्ताधीशांना विरोध सहन होत नाही, आजही गोडसे जिवंत आहे. केंद्र सरकारच्या एकाधिकारशाही विरोधात देशभरात जनता शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करतआपली भूमिका मांडत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांचे हस्तक गोळीबार करत आहेत, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.