शरद पवारांचा नादच खुळा!! हॉस्पिटलमधून थेट राष्ट्रवादीच्या शिबिरात पोचले

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमीच त्यांच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखले जातात. परिस्थिती कशीही असली तरी हार मानायची नाही हाच त्यांचा कानमंत्र…. कॅन्सर सारख्या धोकादायक आजारावर देखील त्यांनी मात केल्याचं आपण पाहिले आहे. आता तर ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबिरात हजेरी लावली आहे. ८१ वर्षाच्या … Read more

राष्ट्रवादीमुळेच भाजपची सत्ता आली; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Chavan pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच फडणवीसांची सत्ता आली असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकारचे काम चांगले होते, मात्र … Read more

चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे गाणं; ऑपरेटर वर गुन्हा दाखल

CHANDRAKANT PATIL PUNE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत असलेलं राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं खूप कमी वेळातच राज्यभर चर्चेत आलं. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमात या गाण्यावर कार्यकर्त्यांना नाचताना आपण पाहिलं असेलच. पण आता चक्क भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात हे गाणं लावण्यात आल्याने अनेकाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याप्रकरणी विनापरवाना साउंड सिस्टीम लावल्याच्या … Read more

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव; पवारांचा सनसनाटी आरोप

pawar family

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या ३ महिन्यापूर्वी शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. रोहित पवार यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार म्हणाले, शिवसेनेनंतर आम्हाला … Read more

राष्ट्रवादीचे 10-15 आमदार शिंदे- फडणवीसांच्या संपर्कात; उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज आहेत असं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यांनतर आता शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचेच १० ते १५ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत असं म्हणत खळबळ उडवून दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, आपल्या … Read more

ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा; मातोश्री बाहेर बॅनरबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेना आणि शिंदे गटात कुरघोडी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मातोश्री बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस कडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनर लावले आहे.  ‘एक संघटना, एक विचार, एक मैदान… शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू … Read more

‘मविआ’ सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता; आंबेडकरांचा गंभीर आरोप

sharad pawar prakash ambedkara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता असा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिले. सांगली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार आहोत, मात्र … Read more

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उपाध्यक्षपदी ‘या’ बड्या नेत्याची निवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यानुसार शरद पवार हे पक्षाचे अध्य्क्ष म्हणून कायम आहेत. तर प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. राष्ट्रवादीच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली … Read more

अजित पवार राष्ट्रवादीत नाराज? पत्रकार परिषदेत घेत दिले स्पष्टीकरण

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. मात्र यावेळी कार्यक्रम सुरु असतानाच अजित पवार मधेच उठून गेले तसेच त्यांचं भाषणही झालं नाही त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आपण कधीही नाराज नाही, तेथे आमचे वरिष्ठ नेते असल्याने मी स्वत:हून बोलणं टाळलं असं स्पष्टीकरण देत त्यांनी सर्व चर्चाना … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध फेरनिवड झाली आहे. शरद पवार यांना पुढील चार वर्षासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियमध्ये सुरु आहे. या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी … Read more