‘सारथी’ संस्थेचा कारभार आता अजित पवारांच्या हातात

मुंबई । राजकीय वादाचा विषय ठरलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: पाहणार आहेत. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज यांनी याबाबत माहिती दिली. मराठा समाजातील तरुणांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य विकासासाठी स्थापण्यात आलेली ‘सारथी’ संस्था बंद पाडण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातला … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देणं शासनाला अवघड; कर्ज काढण्याची आली वेळ

मुंबई । राज्यात गेले ४ महिने असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारचा महसूल घटला असून पगार देण्यासाठी पैसे नाहीत, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ देखील येऊ शकते, अशी चिंताही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. पुनर्वसन विभागाच्या बैठकीसाठी पुण्यात आले असता झालेल्या पत्रकार … Read more

राज्यात सलून लवकरच सुरू होणार; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

गडचिरोली । लॉकडाऊनमुळे राज्यात सलून व पार्लर बंद असल्याने नाभिक समाजाला बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच सलून व पार्लर सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज गडचिरोलीमध्ये पत्रकार परिषदेत दिली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, व्यवसाय बुडाल्याने … Read more

रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आज पहिली बस होणार रवाना

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स चे … Read more

महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली मुख्यमंत्र्यांना सुरक्षेत वाढ करण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलं आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. यांवर मुख्यमंत्री … Read more