हे सरकार जुलमी आणि वसुली सरकार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती. यामुळे भाजप प्रचंड आक्रमक झाली होती. त्यांचा हा आक्रमकपण आज दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाला. भाजपने थेट विधानसभेबाहेर … Read more

राष्ट्रवादीची प्रचार सभा पुन्हा भरपावसात, सातारच्या सभेची पुनरावृत्ती (Video)

पंढरपूर | पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भरपावसात सभा घेतली. त्यामुळे शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या समोर ताजी झाली. आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या भगीरथ भारतनाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभा घेतली. … Read more

सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा; फडणवीसांची विधानसभेत मागणी

मुंबई | मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणावरुन आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांचा काय संबंध आहे याची चौकशी करावी तसेच सचिन वाझेंना आत्ताच्या आत्ता अटक करा अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. पहा व्हिडिओ : ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा … Read more

बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार; राज्य सरकारकडून विशेष योजना जाहीर

मुंबई | आज राज्याचा अर्थसंकल्प २०२१ विधानसभेत सादर केला जात आहे. यावेळी महिलांसाठी अनेल विशेष योजनांना प्रधान्य देण्यात आले आहे. बारावी पर्यंतच्या मुलींना बस प्रवास मोफत होणार असल्याबाबत अजित पवार यांनी घोषणा केली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने खास योजना बनवून शाळकरी मुलींना बस प्रवास मोफत करण्यात येणार आहे. यासाठी १५०० हायब्रीड बस उपलब्ध … Read more

महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट, अजित पवारांची मोठी घोषणा

ajit dada 1

मुंबई । महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22 (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येणार … Read more

मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला … Read more

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले | वाढदिवस विशेष

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच आपल्या जवळच्या लोकांच्या फाईली माणुस आपल्या गटातला आहे म्हणुन सह्या करुन पुढे पाठवण्याचं काम केलं नाही. पदाचा गैरवापर स्वत; केला नाही आणि सहकार्यांनाही करु दिला नाही. यामुळे त्यांची जनसामान्यात आजही एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याच पक्षातील, मित्र पक्षांतील लोकांनी त्यांच्यावर कुरखोड्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अकार्यक्षम ठरवलं पण तरी चव्हाण यांनी आपल्या निर्णयांतून आपल्या कामाची छाप पाडली. ते कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. आजच्या घडीला ताटातली भाजी बदलावी त्याप्रमाणे पक्ष बदलण्याचं सत्र सुरु असणार्‍या काळात पृथ्वीराज चव्हाणांसारखा सच्चा माणुस कसा काय बरं राजकारणात पडला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचं झालं असं… Prithviraj Chavan Education

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४७ चा. वडील आनंदराव चव्हाण पंडीत नेहरुंचे सहकारी आणि ११ वर्ष केंद्रात मंत्री. पुढे आई देखील खासदार. मात्र तरुण पृथ्वीराजचं मन काही राजकारणात नव्हतं. त्या काळात चव्हाण यांनी बी.ई. (आॅनर्स) चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या केलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि अभियंता म्हणुन एका मोठ्या संस्थेत नोकरी सुरु केली. भाषांच्या संगणकीकरणाविषयी चव्हाण यांनी संशोधन केलं. हे सगळं सुरु असताना १९९१ साली एकदिवस मध्यरात्रीच्या २ वाजता त्यांचा फोन खणानला. त्याकाळी काँग्रेस हायकमांडच्या एका फोनने देशाची राजकीय गणितं बदलायची. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेला फोन दिल्लीवरुनच होता. राजीव गांधी बोलत होते. “पृथ्वीराज आपको कराडसे लोकसभा चुनाव लढना है। अभी जल्द जा कर चुनाव का अर्ज दर्ज करो. आपका प्रचार करणे मै खूद आऊंगा।” असं राजीव गांधींनी तिकडून सांगितलं. राजीव गांधींकडे तेव्हा एक तरुन, तडफदार नेतृत्व म्हणुन पाहिलं जात होतं. त्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, अभ्यासू, आणि जनतेशी आस्था असणार्‍या नेत्यांची फळी बांधायची होती. त्याचसाठी त्यांनी चव्हाण यांची निवड केलेली. Prithviraj Chavan Education

हायकमांडचा फोन आल्यानं पृथ्वीराज चव्हाण पहाटेच पुण्याहून कराडला निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. कसातरी गडबडीत त्यांनी अर्ज भरला. थोडा धोडका प्रचार केला. आणि ते खासदार म्हणुन निवडून आले. पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी जबाबदारीची कामं पाहीली. नंतर २०१० रोजी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंध्यरात्री आलेल्या त्या एका फोनमूळे चव्हाण यांचे आयुष्यच बदलून टाकले. एक तरुण उच्चशिक्षित इंजिनिअर खासदार झाला. Prithviraj Chavan Education

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण

 

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र ५व्या क्रमांकावर, राज्य आर्थिक सर्वेक्षण अहवालात माहिती उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्प उद्या सादर करण्यात आहे. त्याआधी आज राज्यविधानसभेत सादर झालेल्या राज्य आर्थिक सर्वेक्षण अहवालातराज्याचा आर्थिक स्थितीबाबत चिंताजनक बाब समोर आली आहे. या अहवालात राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसुली तूट वाढली असल्याचं अहवालात म्हटलं गेलं आहे. तर दरडोई उत्पन्नाच्याबाबत महाराष्ट्राची ५व्या क्रमांकावर घसरण झाली असल्याचं नमूद केलं आहे. राज्यावर सध्या … Read more