तक्रारींचा तत्काळ निपटारा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

औरंगाबाद | नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमिवर लोकशाही दिनी प्रत्येक विभागाने त्यांच्या अंतर्गत प्राप्त तक्रारींवर तत्काळ योग्य ती कार्यवाही करून निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज झालेल्या लोकशाही दिनात दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी … Read more

मनपा प्रशासकांचा सायकल दौरा; खाम नदीला दिली भेट

Astik kumar pandey

औरंगाबाद | शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोणताही फौजफाटा न घेता सायकलवर स्वार होऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडे नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी औरंगाबादेतील ऐतिहासिक खाम नदीला भेट देत त्याठिकाणी असलेल्या नागरिकांची विचारणा केली. मनपा प्रशासक पाण्डेय यांनी खामनदी विकास कामाची पाहणी करत अधिकारी-कर्मचारी आणि कामगार यांच्याशी चर्चा केली. दुसऱ्या … Read more

10 हजारापेक्षा जास्त बेकायदेशीर फार्महाऊस असल्याचा संशय- प्रशासन

Farmhause

औरंगाबाद | जिल्ह्यातील बेकायदेशीर फार्महाऊस असल्याचा संशय प्रशासनाला आला आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून तलाठ्यांना सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आला आहे. फार्महाऊस बांधण्यासाठी ‘महसूल एनए’ यापैकी कोणतीही परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बांधकामासाठी ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक असते. परंतु विनापरवानगी दहा हजारांपेक्षा जास्त फार्महाउस असल्याचा संशय प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. मागील महिन्यात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी एका फार्महाऊसवर कोरोनाचे नियम … Read more

जंगल सफारीसाठी मनपाचा प्रस्ताव तयार, लवकरच शासनाकडे पाठवणार

zoo

औरंगाबाद | शहरातील मिटमिटा येथे महापालिकेतर्फे प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाच्या काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर यासाठी अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश देखील दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिकेने सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची … Read more

तापोळा- महाबळेश्वर मार्ग बंद : तीन ठिकाणी दरडी कोसळल्या, पावसाचा जोर कायम

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मागील 2 दिवसात तीन ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. त्यामुळे महाबळेश्वर- तापोळा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रशासनाकडून दरडी हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सातारा जिल्ह्यात पावासाने मुसळधार हजेरी लावली. या अतिवृष्टीमुळे भूस्खलन, दरडी कोसळण्याचे प्रकार … Read more

डिसेंबरच्या अखेरीस वाढेल पाण्याची क्षमता-महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे

Water supply

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील काही भागात कधी पाचव्या तर कधी नवव्या-दहाव्या दिवसांनी पाणीपुरवठा होतो. याबाबत महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांच्याकडून आढावा घेण्यात आला. सध्या शहराला जायकवाडी धरणातून 120 -125 एमएलडी पाणी मिळत आहे. त्याचबरोबर महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याची क्षमता 15 ते 20 एमएलडी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची तपासणी केली असून डिसेंबर महिन्याच्या … Read more

राज्य महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पाच हजार वृक्षारोपण

Abdul sattar

औरंगाबाद | संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आज रराज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते आज पाच हजार वृक्षांचे वृक्षारोपण विद्यापीठ परिसर बुद्ध लेणीच्या परिसरात करण्यात आले. शहरांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीने तसेच फाउंडेशनच्या वतीने बुद्ध लेणी परिसर असेल तसेच गोगाबाबा टेकडी परिसर असेल या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करण्यात येते. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार … Read more

बेकार, भंगार वाहनांवर कारवाई करण्याचे प्रशासनाचे आदेश; 2 ऑगस्ट पासून कारवाई सुरु

Astikkumar pande

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर कारवाईचे आदेश शुक्रवारी प्रशासकांकडून देण्यात आले आहे. या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाई करण्यात येणार असून महिनाभर ही कारवाई मोहीम सुरु राहणार आहे. या भंगार बिनकामी वाहनांवर सात दिवसांची नोटीस लावण्यात येईल आणि सात दिवसानंतर … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे पासून बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन सूचना जारी

Corona 3rd way

औरंगाबाद | सध्या संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे थैमान सुरु आहे. आता दुसरी लाट संपुष्टात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. म्हणूनच प्रशासनाने या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शन सूचना जारी केलेल्या आहेत. सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. जिल्ह्यात शनिवारी रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 46 हजार 717 … Read more

आता कोणत्याही राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

Grain

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे बर्‍याच जणांचे रोजगार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असलेल्याची स्थिती बिकट आहे. गरिबांना मदत मिळण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना पाच किलो धान्य मोफत मिळेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. या … Read more