महिलांनी स्वसुरक्षेसाठी कायदा हाती घ्यावा की, घरकोंबड्या सरकारसारखे घरात बसायचे ?

raksha khadse

औरंगाबाद – कोरोना काळामुळे शक्ती कायदा करण्यास वेळ मिळाला नाही असे सत्ताधारी सरकारचे म्हणणे आहे मात्र जिथे जनतेचे प्रश्न मांडले जातात ते अधिवेशन सुद्धा पूर्ण काळ होत नाही केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन राज्य सरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत आहे. महिला सुरक्षेच्या बाबतीत सरकारची बेफिक्री चीड आणणारी आहे आता महिलांनी स्व सुरक्षेसाठी कायदा हाती घ्यायचा … Read more

पाठीवर थाप मारल्याने खून करणारे पती-पत्नी गजाआड 

Crime

औरंगाबाद – मद्य प्राशन केल्यानंतर पाठीवर थाप टाकल्याचा जाब विचारताच लक्ष्मण चव्हाण (30, रा. सुदर्शननगर, अकोट, जि. अकोला) या युवकाचा खून केल्याचा प्रकार 13 मार्च रोजी मिटमिटा परिसरात घडला होता. या प्रकरणातील फरार पती पत्नीला सहा महिन्यांनी छावणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजय ऊर्फ संजू गोलू काळे (28) आणि उषा संजय काळे (दोघे रा.मिटमिटा तलावाजवळ) … Read more

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या 185 जागांसाठी पोटनिवडणूक

औरंगाबाद – जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतीमधील 185 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी 21 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे आकस्मिक निधन, राजीनामा, अपात्र ठरल्याने रद्द झालेले सदस्यत्व आणि अन्य कारण रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या 128 ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवडणुक आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी … Read more

आता तर हद्दच झाली ! रिक्षात सिगारेट पेटवू नका सांगितल्याने दाम्पत्याला मारहाण 

Crime D

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात क्षुल्लक कारणावरून खुन, मारहाण होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. रिक्षातून प्रवास करताना सिगारेट पेटवू नको, असे सांगितल्याने रिक्षाचालक व त्याच्या भावांनी प्रवासी दाम्पत्याला शिवीगाळ करून मारहाण संतापजनक घटना शनिवारी सायंकाळी सिडकोतील काळा गणपती मंदिरासमोर घडली. याविषयी अधिक वृत्त असे … Read more

हे काय शिकवणार ? बोगस नाहरकत प्रमाणपत्र अपलोड करुन थेट विद्यापीठाची फसवणूक 

bAMU

औरंगाबाद – बोगस नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा परदरी तांडा येथील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा डाव विद्यापीठ आणि तंत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या सतर्कतेमुळे उधळला असून या महाविद्यालयाविरुद्ध विद्यापीठ तसेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. थेट विद्यापीठाची अशा प्रकारे फसवणूक झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याविषयी अधिक … Read more

मध्यपी शिवशाही चालकाचा 30 प्रवाशांच्या जिवाशी खेळ 

shivshahi

औरंगाबाद – मागील 15 दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीच्या औरंगाबाद विभागाने प्रवाशांच्या सेवेसाठी औरंगाबाद ते पुणे दरम्यान खासगी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. अशातच पुण्याहून औरंगाबाद दरम्यान मद्यपान केलेल्या खासगी शिवशाही बसच्या चालकाने भरधाव बस चालवून 30 प्रवाशांच्या जिवाशी खेळ केल्याची घटना … Read more

कोरोना लस न घेतलेल्यांना पेट्रोल दिलं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण पेट्रोल पंप सील; पहा व्हिडीओ

pp

औरंगाबाद – जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोना तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश 9 नोव्हेंबरमध्ये जारी केले होते. ह्या … Read more

दोन वर्षांनंतर भावी शिक्षकांसाठी आज टीईटी परीक्षा

औरंगाबाद – राज्य शिक्षण परिषदेतर्फे तीन वेळेस पुढे ढकलल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दोन वर्षानंतर आज सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी दीड ते साडेचार या दोन सत्रात होणार आहे. या दोन्ही पेपरसाठी जिल्ह्यातील एकूण 16 हजार 236 परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्रावर 144 अन्वये मनाई आदेश … Read more

रक्ताच्या नात्याला काळिमा ! मुलगा व सुनेच्या मारहाणीत बापाचा मृत्यू

Crime

औरंगाबाद – घरगुती मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा व सुनेने कुऱ्हाडीच्या दांड्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या बापाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना पैठण तालुक्यातील बिडकीनपासून जवळ असलेल्या डोंगरू नाईक तांड्यावर मंगळवारी घडली. राजू भुरा चव्हाण असे मयताचे नाव आहे. डोंगरू तांडा येथील राजू भुरा चव्हाण यांचे मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यासोबत … Read more

‘पुरुष कधी स्वतंत्र होणार ?’ जागतिक पुरुष दिनी पत्नी पिडीत आश्रमात शीर्षासन आंदोलन

pp

औरंगाबाद – शहरापासून जवळच असलेल्या पत्नी पिडीत आश्रमात जागतिक पुरुष दिन शीर्षासन आंदोलन करत साजरा करण्यात आला. आंदोलकांनी यावेळी पुरुषांचे हक्क संरक्षणासाठी विविध मागण्या केल्या. महिला दिन साजरा करण्यात अनेक पुरुषांचाही सहभाग असतो. अनेक शासकीय कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. परंतु, पुरुष दिन कुठल्याही शासकीय कार्यालयात साजरा होताना दिसत नाही. हा भेदभाव संपुष्टात आणणे … Read more