सराईत मंगळसूत्र चोराला पोलिसांनी पोलिसांनी केले अटक

औरंगाबाद : मंगळसूत्र हिसकाविणाऱ्या कुख्यात आरोपीला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन मंगसूत्र आणि दोन घरफोडीचे गुन्हे सिडको पोलिसांकडून उघडकीस आले आहेत. वैभव गजानन इंगोले वय २३, (रा. कमळापूर फाटा, हनुमाननगर, रांजणगाव शेणपुंजी) असे आरोपीचे नाव आहे. एन-5 सिडको भागातील सत्यमनगर या परिसरात आरोपी संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली. … Read more

दुचाकी चोरीचे सत्र सुरूच; अजून पाच दुचाकी लंपास

औरंगाबाद : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून आणखी पाच दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. गुरुवारी देखील शहरातून दुचाकी लांबविल्याचे समोर आले होते. रवि अर्जुन चिंचोलकर (३७, रा. संभाजी कॉलनी, पिसादेवी रोड, हर्सुल) यांनी २९ जून रोजी रात्री अकराच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-बीआर-३००८) उभी केली होती. त्यांची दुचाकी मध्यरात्री चोराने लांबवली. आदील हबीब मोहम्मद … Read more

मनपा हद्दीतील व्यावसायिकांना आता ट्रेंड लायसन्स बंधनकारक

औरंगाबाद | मनपा हद्दीतील व्यावसायिकांना आता ट्रेंड लायसन्स घ्यावे लागणार आहे. मनपा हद्दीतील 108 प्रकारच्या अस्थापनाची यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले असताना शासनाकडून हा परवाना शुल्क आकारणे चुकीचे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या लायसनसाठी व्यवसायिकांना 5 ते 20 हजार रुपयांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे. मनपा हद्दीत व्यावसायिक … Read more

शहरात डेंग्यू संशयित सहा रुग्ण आढळले.

dengue-malaria

औरंगाबाद  | शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण आढळले आहेत. शहरातील महापालिका आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. जानेवारी महिन्यापासून शहरात एकूण तीस डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले असल्याचे, महापालिकेच्या अहवालातून समजली आहे . शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून शहरात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि त्यातच डेंग्यूने डोके वर काढले आहे. पावसाळ्यात … Read more

धक्कादायक : 11 वर्षीय मुलाला बुडवून मारले, 8 महिन्यानंतर एका महिलेसह 5 मुलांवर खुनाचा गुन्हा

औरंगाबाद : तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मुलाचा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करत एका आईने न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन आठ महिन्यानंतर एका महिलेसह पाच अल्पवयीन मुलांवर मंगळवारी सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पतीपासून विभक्त राहणाऱ्या प्रतिपादन दत्ता शिंदे वय 38, रा.विटखेडा या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. 25 ऑगस्ट 2020 रोजी … Read more

नोकरीचे आमिष दाखवून मेस चालक तरुणीवर केला बलात्कार; आरोपीवर गुन्हा दाखल

Crime

औरंगाबाद | कोरोना काळात मेस व्यवसाय बंद झाल्याने जालनाच्या जिल्हा परिषद किंवा औरंगाबाद महानगरपालिकेत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. जानेवारी महिन्यात निर्जन स्थळी नेवून कारमध्ये मारहाण करून अरुण अग्रवाल (रा .जालना ) याने अत्याचार केल्याची तक्रार महिलेने सातारा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अग्रवालवर गुन्हा … Read more

आता औरंगाबादेत लवकरच येणार रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही लस

औरंगाबाद : शहरात आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीचा वापर करणे सुरू आहे. या दोन भारतीय लसीचा वापर करून शहरासह जिल्ह्यात लसीकरण केले जात आहे. मात्र, आता लवकरच शहरात रशियाची स्पुटनिक व्ही ही लस दाखल होणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शहरात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील सिग्मा … Read more

औरंगाबादेत मुसळधार पावसाची हजेरी; 34 मिलिमीटर पावसाची नोंद

rain

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी जाणवत आलेल्या उकड्यानंतर रात्री आठच्या सुमारास शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर रात्री उशिरा 9 वाजेनंतर जास्त मुसळधार पावसाला सुरूवात झाली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहराच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला. रात्री साडेअकराच्या सुमारास एमजीएमच्या वेध शाळेत ३३.८ मिमी पावसाची … Read more

अनलॉक नंतर बाजारपेठा पूर्णपणे उघडण्याकडे उद्योजकांचे लक्ष

औरंगाबाद : अनलॉक नंतर हळूहळू सर्वच उद्योग रुळावर येत आहेत. तरी सुद्धा औरंगाबादेतील काही बाजारपेठा पूर्णपणे सुरू झालेल्या नाहीत. उत्पादित मालाला उठाव मिळत नसल्यामुळे ऑर्डरचे प्रमाण घटले असून 70% वर येऊन पोहोचले आहे. सप्टेंबर ऑक्टोबरच्या लॉकडाऊननंतर उद्योजकांना गती मिळाली होती. परंतु आता पुन्हा दुसरा लॉकडाऊन लागल्यामुळे उद्योजकांना आर्थिक फटका बसला आहे. यंदा लॉकडाऊन मध्ये उद्योग … Read more

नातवांनी आजीचे डोके फोडत अंगावरील सोने लुबाडले

crime

हिंगोली : आजी आणि नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना हिंगोली येथून उघडकीस आली आहे. नातवांनी आजीच्या डोक्यात रॉड घालून डोके फोडले त्याचबरोबर त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून पळवण्याची घटना घडली आहे. रुक्मिणीबाई सदाशिव गाढवे असे या आजीचे नाव असून सेनगाव येथे त्या त्यांच्या 2 नातवांसोबत राहत होत्या. तू विकलेल्या जमिनीचे पैसे आम्हाला दे अशी मागणी … Read more