मोफत शिवभोजन थाळीचा आज शेवटचा दिवस

औरंगाबाद : राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपासून शिवभोजन अंतर्गत मोफत जेवण वाटप केले जात आहे. शिवभोजन थाळीची मूळ किंमत 10 रुपये आहे पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावले होते आणि त्यामध्ये लोकांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात होती. आज मोफत शिवभोजन थाळीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून शिवभोजन थाळीसाठी शुल्क आकारण्यात येणार आहेत. शिवभोजन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये गोरगरीब जनतेला … Read more

अंगाला स्टील चिटकलं नाशिकनंतर औरंगाबादेतही चिटकले स्टीलचे भांडे चुंबकत्व चमत्काराचा मात्र होतोय इन्कार

औरंगाबाद : नाशिक येथील ७१ वर्षीय व्यक्तीच्या शरीराला धातूचे नाणे आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला. कोरोनाची लस घेतल्यानंतरच असा प्रकार झाल्याचा दावा सदर व्यक्तीकडून करण्यात आला. त्यानंतर आता औरंगाबादेतही अशीच घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते विष्णू वखरे यांच्याही शरीराकडे धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षित होत आहेत. मात्र याचा त्यांना … Read more

लवकरच मराठा समाज उतरणार रस्त्यावर; महाराष्ट्रभरात मूक आंदोलन आणि लॉंगमार्शचा खासदार संभाजीराजे यांचा इशारा

औरंगाबाद : मराठा समाज आता आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. काल खासदार संभाजीराजे भोसले यांनी कायगाव टोक येथे मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले. तसेच कोपर्डी येथे भेट सुद्धा दिली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारनं दिलेल्या नोकरीच्या आश्वासनाची आठवण करुन दिली. अशा कुटुंबातील एकाला लवकर नोकरीवर घ्या, अशी … Read more

बिडकीन मध्ये चड्डी- बनियान गॅंगची दहशत; तीन घरे फोडण्याचा प्रयत्न दुचाकी लंपास

औरंगाबाद : बिडकीन गावात शनिवारी मध्यरात्री चड्डी-बनियान गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला.गावातील तीन घरे फोडण्याचा प्रयत्न झाला व दुचाकी लंपास केली. नागरिकांनी आरडाओरड केल्याने चोरटे पळाले.या प्रकरणी गावकऱ्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास बिडकीन गावात चड्डी- बनियान घातलेले 6 ते 8 चोरटे दाखल झाले होते. चोरट्यानी अहेमद पटेल यांचे घर फोडण्याचा … Read more

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा… – विनायक मेटे

औरंगाबाद : संभाजीराजे आणि आघाडी सरकारचे चांगले संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांचे चांगले मित्र आहेत. तर त्यांनी सरकारवर दबाव आणून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. असे विधान शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. २६ जून रोजी मराठा आरक्षण संघर्ष समितीची पहिला मेळावा औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे. शासनावर आमचा … Read more

डिप्रेशन मध्ये येऊन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Lake Hersul

औरंगाबाद | २२ वर्षीय तरुणीने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु सुदैवाने तिचा जीव वाचला.  ही तरुणी वैदयकिय शिक्षण घेत होती. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी रस्ताने जाणार्‍या एका तरुणाची मदत घेऊन तिला बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी साडेआठच्या सुमारास घडली आहे. हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीचे प्राण तातडीने सुरक्षा रक्षकाने … Read more

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘त्या’ विकास कामांबद्दल केली नीती अयोगाच्या सीईओ सोबत चर्चा

chandrakant khaire

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला नीती आयोगाचे सीईओ यांनी भेट दिली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैर यांनी विकास कामांबद्दल त्यांच्यासोबत अर्धातास चर्चा केली. या चर्चेत त्यांनी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथे केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (CGHS) सुरू करा, राष्ट्रीय महामार्ग ५२ ( २११ ) अंतर्गत कन्नड-चाळीसगाव घाटातील बोगदा, औरंगाबाद चाळीसगाव … Read more

खंडणी देण्यास नकार देताच केला कात्रीने हल्ला

murder

औरंगाबाद | कामगार चौकातील मेडिकल दुकानदारासह ग्राहकांकडून खंडणी उकळण्यासाठी थेट कात्रीनेच हल्ला केल्याची घटना 11 जुन रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. कृष्णा दगडू जाधव असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक कृष्णा जाधव कामगार चौकातील देवगिरी मेडिकल वर आला. त्याने दुकानावर आलेल्या … Read more

आईने असं काय केलं की, 13 वर्षीय मुलीने घेतला गळफास

murder (1)

औरंगाबाद | दहा रुपये न दिल्यामुळे रागाच्या भरात 13 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिडको एन 13 मधील वानखेडे नगरात शुक्रवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहिनी सुनील शेजवळ असे मृत मुलीचे नाव असून मोनिकाचे आई वडील, भाऊ दोन वर्षापासून वानखेडे नगर येथे किरायाच्या घरात … Read more

धावणी मोहल्ल्यातील जुन्या वाड्यातून 28 तोळे सोने लंपास

gold Stolen

औरंगाबाद | सामाजिक कार्यकर्ता विजया अवस्ती यांच्या घरात शनिवारी संध्याकाळी चोरी झाली आहे. मुलाकडे राहण्यासाठी गेलेल्या वृद्ध दांपत्याचे धावणी मोहल्ल्यातील जुन्या वाड्यातून 28 तोळे सोने चोरीला गेले आहे. विजया अवस्ती यांचे सासू सासरे 14 ते 26 मार्च या कालावधीत देवानगरी येथे काही दिवस राहण्यासाठी गेले होते. त्यानंतर पुन्हा धावणी मोहल्ला येथे आले असता, 9 जून … Read more