…तो पर्यंत फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडेनी बांधली खूणगाठ

‘जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही. तो पर्यंत मी फेटा बांधणार नाही’, अशी खूणगाठ भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बांधली. त्या आष्टी मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुरेश धस आमदार भीमराव धोंडे, यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली

‘घरात आलबेल आहे सांगण्याची पाळी का येते?’, सुरेश धस यांचे शरद पवार यांच्यावर शरसंधान

धस हे ‘महायुती’चे उमेदवार माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड मतदार संघातील रायमोहा येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंकजा मुंडे, जयदत्त क्षिरसागर रमेश पोकळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

बीड मधील लढतींचे चित्र स्पष्ट, महायुती मधील गेवराईची बंडखोरी वगळता ‘बंड थंड’

गेवराई वगळता बीड जिल्ह्यात ‘महायुती’मधील सर्व बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे बीड मधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे पाच मतदार संघात दुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल

सुराज्य सेनेचे बीडमधे मोफत कांदा वाटप आंदोलन

सेना Surajya Sena

बीड | सरकारच्या शेती धोरणाने कांदा उत्पादक शेतकर्याला रडवल आहे. कांद्याचा फक्त वाहतुक खर्चही निघत नाही इतके कांद्याचे भाव गडगडले आहेत. याचा निषेध म्हणुन सुराज्य सेना, सीपीआय, आणि समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदा वाटप हे आगळं वेगळं आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी 93 रूपयाची आर्थिक … Read more