नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन शिवसेनेने संधीसाधू राजकारण केलं आहे- ओवेसी

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने मतदान केल्यानं त्यांच्या भूमिकेवर आता एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे असा शाब्दिक वार करत ओवेसी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

अमेरिकन आयोगाचा नागरिकत्व विधेयकावर तीव्र आक्षेप,अमित शहांवर निर्बंध लादण्याची केली मागणी

तब्बल आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने ३११ तर विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी मंगळवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. त्यामुळे आज केंद्र सरकारची अग्निपरीक्षा होणार आहे. मात्र या विधेयकानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना यापुढे बेकायदा मानले जाणार नाही. त्यांना भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येईल. अशा तरतुदी असणारे हे विधेयक काल लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून गृहमंत्री अमित शहांवर लोकसभेत जोरदार टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकावर सध्या सभागृहात चर्चा सुरू आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी याविधेयकाला जोरदार विरोध केला असून, हे विधेयक अल्पसंख्याकांविरोधी असल्याचा सरकारवर आरोप केला हे आहे.

संसदेत पुन्हा खडाजंगी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडणार

मागील सहा दशकांपासून लागू असलेल्या नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यासाठीचे विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी लोकसभेत मांडतील आणि ते संमत करण्याच्या दृष्टीने त्यावर चर्चा करण्यात येईल, असे लोकसभेच्या सोमवारच्या कामकाजपत्रिकेत म्हटले आहे.