या बलात्काऱ्याला हाकलून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला..; चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच … Read more

माझ्यावर कितीही अटॅक केले तरी मी शांत राहणार नाही – चित्रा वाघ कडाडल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे. माझ्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं, असा दावा वाघ यांनी केला. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी, संजय राठोड यांच्या बद्दल ते योग्य तो निर्णय घेतील – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मिस्टर सत्यवादी आहेत. ते न्यायप्रिय नेते आहेत.असेही राऊत म्हणाले. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच … Read more

शरद पवार राठोडांना पाठीशी घालणार नाहीत; मला मुख्यमंत्र्यांवरही विश्वास आहे – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून विरोधी पक्ष भाजपने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच दरम्यान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं … Read more

अधिवेशनात विरोधक फाडून खातील म्हणून कोरोनाचं भांडवल ; निलेश राणेंचा गंभीर आरोप

Nilesh rane and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीका केली आहे. अधिवेशन तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी ते टाळण्यासाठी कोरोनाचं भांडवल करत आहेत. अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारमधील अनेक मंत्री कुठल्या तरी भानगडीत अडकले आहेत. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 7 वाजता जनतेशी संवाद साधणार ; लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.महाराष्ट्रात पुन्हा नव्यानं लॉकडाऊन लागणार का अशी जनतेत चर्चा आहे. त्यावर संभ्रमही मोठ्या प्रमाणात दिसतो आहे, त्यावर … Read more

आधी तुमची मानसिकता बदलायला हवी, मग दुसऱ्यांना सल्ला द्या; भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

Uddhav Thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून संकट वाढलं आहे. काही शहरात लॉकडाउन केलं असलं तरी कोरोना रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांची वाढती गर्दी रोखण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. दरम्यान, यावरून आता भाजप नेते … Read more

जनतेला वाऱ्यावर सोडलंय, निदान मंत्र्याला तरी शोधा ; भाजपची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून ते गायब आहेत. दरम्यान महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज याच मुद्द्यावरून सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. … Read more

राज्यपाल vs ठाकरे सरकार वाद पेटणार ; राज्यपालांच्या विमानप्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. … Read more

… म्हणून ठाकरे सरकारला स्थगिती सरकार नाव पाडलं- नवनीत राणा

नवी दिल्ली । केंद्र सरकारची जी योजना आली, तिला आधी स्थगिती देण्याची परंपराच महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने सुरु केली. त्यांना आम्ही स्थगिती सरकार असं नाव दिलं, असं खासदार नवनीत कौर राणा यांनी लोकसभेत म्हटलं. ठाकरे सरकारने मुंबई मेट्रो आरे कारशेड, बुलेट ट्रेन, ग्राम सडक योजना, मराठवाडा वॉटर ग्रील्ड, सीएम फेलोशिप, मुंबई पुणे हायपर लूप, नगरविकास आणि … Read more