कहर कोरोनाचा; देशभरात २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू; 2 हजार 958 नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाबाधितांची आकडा 50 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशाभरात 1 हजार 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 183 लोक … Read more

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; सरकारी दवाखान्यात आता प्रायव्हेट डाॅक्टरांना ड्यूटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खासगी डॉक्टरांबाबत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने असे म्हटले आहे की आता खासगी डॉक्टरही सरकारी रुग्णालयात बसतील. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक (मुंबई) म्हणाले की आम्ही आता खासगी डॉक्टरांना कोरोना विषाणूच्या रुग्णांवर १५ दिवस उपचार करण्यास सांगितले आहे. We’ve asked all private doctors, who are … Read more

टेंशन वाढलं! देशभरात कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ; २४ तासांत १९५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोनाचा संसर्ग थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून आता मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाने १९५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या २४ तासांत मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. देशात एकूण … Read more

चिंता वाढली! देशात २४ तासांत 195 बळी, 3 हजार 900 नवे कोरोना रुग्ण सापडले

नवी दिल्ली । लॉकडाऊन काळातही भारतातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा तेजीनं वाढताना दिसतोय. मे महिन्यात लॉकडाऊनच्या ४२ व्या (मंगळवार) दिवशीही दिसून आलेली ही वाढ लक्षणीय आहे. तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात करोनाने 195 जणांचा बळी घेतला असून तब्बल 3 हजार 900 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची रुग्ण संख्येतील … Read more

राज्यात ३१ मेपर्यंत ग्रीन झोनची संख्या वाढलीच पाहिजे; मुख्यमंत्र्यांच्या कडक सूचना

मुंबई । राज्याचे अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोननुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे नेता येईल हे पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा … Read more

केरळ विजयाच्या उंबरठ्यावर! ४९९ पैकी ४६५ कोरोनाबाधित झाले बरे; एकही नवा रुग्ण नाही

तिरुअनंतपुरम । देशात कोरोनाने सर्वात आधी ज्या राज्यातून घुसखोरी केली होती ते राज्य म्हणजे केरळ. मात्र, आता केरळ कोरोनाच्या लढाईत विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. केरळ लवकरच या विषाणुला राज्यातून हद्दपार करणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. आता केरळमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून, गेल्या काही दिवसांत एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळलेला नाही. विशेष … Read more

दिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

नवी दिल्ली । देशात करोना फैलाव अद्यापही थांबलेला नाही. देश लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. अशा चिंताजनक वातावरणात एक एक दिलासा देणारी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आतापर्यंत ११ हजार ७०६ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत १०७४ लोकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर जवळपास २७.५ टक्के लोकांनी करोनावर … Read more

‘रामराज्य’ कि ‘कोरोना साम्राज्य’! रस्त्यावर पडलेले २५ हजार रुपये कोणीच उचलले नाही

बिहार । भारतात रामराज्य परत आलंय. तुम्ही म्हणालं कसं? जवळपास २५ हजार रुपयांचं बंडल रस्त्यावर पडलेलं असताना कोणीही त्याला हात लावला नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? हे कलियुग आहे १ रुपया जरी रस्त्यावर कोणाला दिसला तरी लोक चटकन लक्ष्मीचं वरदान समजून खिशात टाकतात आणि इथे तर २५ हजार आहेत. पण असं खरचं … Read more

धक्कादायक! महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात परतलेल्या ७ मजुरांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली । केंद्र सरकारनं लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेल्या मजूर-कामगारांना घरी जाण्याची मुभा दिली. या निर्णयानंतर अनेक कामगार आता घरी परतू लागले आहेत. मात्र ज्या गोष्टीची भीती वाटतं होती तेच घडत असल्याचा इशारा देणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या कामगारांपैकी ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उत्तरप्रदेशातील … Read more

कोरोनावरील वॅक्सिनबाबात बिल गेट्स म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स म्हणाले की आपल्याला येत्या ९ महिन्यांत कोरोना विषाणूची लस मिळू शकेल.विशेष म्हणजे बिल गेट्सचे बिल आणि मिलिंदा फाउंडेशन कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.अमेरिकेच्या अव्वल संसर्गजन्य रोग अधिका-याच्या संदर्भात एका ब्लॉग पोस्टमध्ये बिल गेट्स यांनी म्हटले आहे की डॉ. अँथोनी फोसे यांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या लसीच्या … Read more