कोरोनावरील वॅक्सिनबाबात बिल गेट्स म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स म्हणाले की आपल्याला येत्या ९ महिन्यांत कोरोना विषाणूची लस मिळू शकेल.विशेष म्हणजे बिल गेट्सचे बिल आणि मिलिंदा फाउंडेशन कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.अमेरिकेच्या अव्वल संसर्गजन्य रोग अधिका-याच्या संदर्भात एका ब्लॉग पोस्टमध्ये बिल गेट्स यांनी म्हटले आहे की डॉ. अँथोनी फोसे यांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूच्या लसीच्या विकासास १८ महिने लागतील.मी त्यांच्याशी सहमत आहे,ही वेळ किमान ९ महिने तर जास्तीत जास्त २ वर्षांची असू शकेल.

या पोस्टमध्ये बिल गेट्स पुढे म्हणाले की,हि लस तयार होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागला तरीही शास्त्रज्ञांच्या दृष्टीने तो एक विक्रमच ठरणार आहे. ते पुढे म्हणाले की कोविड -१९ साठी सध्या तयार करण्यात आलेल्या ११ पैकी १० लसींवर जास्त आशा आहेत.ते पुढे म्हणाले की, काही संशोधक आरएनए आणि डीएनए लसी बनवण्यावर काम करत आहेत याबद्दल मला खूप आनंद होत आहे. हे आत्ता खूप अवघड दिसत आहे पण त्यामध्ये आशेचे काही किरणही आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगातील कोरोना उद्रेका दरम्यान बिल गेट्सचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकले जात आहेत.यापूर्वी त्यांनी संपूर्ण अमेरिकेत बंद पुकारण्याची मागणी केली होती आणि ते म्हणाले होते की अमेरिकेमध्ये या साथीच्या रोगामुळे झालेल्या मृत्यूची संख्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अंदाजापेक्षा कमी असेल.अमेरिकेतील कोरोनामुळे १ लाख ते २ लाख ४० हजार लोक मरण पावण्याची शक्यता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

You might also like