ओमिक्रॉनचा धोका वाढला !! कर्नाटक नंतर आता ‘या’ राज्यात सापडला अजून एक रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा नवा व्हेरीएन्ट ओमिक्रोनचा भारतात शिरकाव झाला असून कर्नाटक नंतर आता गुजरात मधील जामनगर येथील एका 74 वर्षीय व्यक्तीला ओमीक्रोन ची लागण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली असून चिंतेत भर पडली आहे. सदर व्यक्ती ही 74 वर्षीय असून 28 नोव्हेंबर ला ते अहमदाबाद विमानतळावर उतरून जामनगर ला गेला … Read more

राज्यात लवकरच नवी नियमावली?? वडेट्टीवारांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार काय नवीन नियमावली जाहीर करणार का असा सवाल काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता त्यांनी सूचक इशारा दिला. विजय … Read more

देशात लॉकडाऊन लागणार का?? केंद्राने दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्टचा शिरकाव झाला कर्नाटक येथे 2 रुग्ण सापडले आहेत. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली असून आता देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले लॉकडाउन ची सध्या गरज नसल्याचे म्हंटल आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत … Read more

ओमिक्रॉनचा देशात शिरकाव; ‘या’ राज्यात सापडले 2 रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. भारतात देखील गेल्या काही दिवसांपासून सतर्कता बाळगण्यात आलं आहे. तरीही अखेर देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे 2 रुग्ण सापडलं आहेत. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती दिली आहे Two cases of #Omircron detected in … Read more

ओमिक्रॉनचा धोका!! राज्यात लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला नाही, त्यामुळे लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हंटल की, … Read more

शाळा 1 डिसेंबर पासून सुरू; सरकारने जारी केली नवी नियमावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. मात्र राज्यातील शाळा या मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण शाळा सुरु करताना काय खबरदारी घ्यावी यासाठी सविस्तर नियमावली देण्यात आलीय. सध्या राज्यातील ग्रामीण भागांत पाचवी ते बारावी आणि … Read more

ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! परदेशी नागरिकांसाठी केंद्राची नवी नियमावली जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिके वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या विषाणूची गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. काय आहेत हे … Read more

ओमिक्रॉन कोरोनाचा धोका!! 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार का?? राजेश टोपे म्हणतात…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या नव्या व्हेरींऍंट चा धोका पाहता केंद्रासाहित राज्य सरकारने देखील प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत. अशा वेळी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होऊ शकतो का असा सवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी यावर आपलं उत्तर दिले. राजेश टोपे म्हणाले, अजून ओमिक्रॉनसंबंधी आपल्या राज्याला अद्याप भीती नाही, … Read more

केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली असून ‘कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंटचा धसका; केंद्राने राज्याला केल्या ‘या’ सूचना

Narendra Modi Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांनासूचना देणारे पत्र लिहिलं आहे. कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत. तसंच, RTPCR चाचण्या वाढवा आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर नजर ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. या … Read more