4 शिपायांचा शाॅक लागून जागीच मृत्यू; काॅलेजला रंगरंगोटी करताना शिडी घसरली अन्..

अमरावती : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करणाऱ्या चार जणांना विजेचा जोरदार धक्का लागल्यामुळे ते जागीच ठार झाले. अमरावती शहरालगत कठोरा परिसरात असणाऱ्या पोटे महाविद्यालयात ही घटना घडली. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा महाविद्यालय परिसरात पोहोचला असून अग्निशामक दलही महाविद्यालयात पोहोचले आहे. चारही मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात … Read more

क्रेन खाली चिरडून सेवानिवृत्त सैनिकाचा जागीच मृत्यू; सायकलसह 20 मीटर फरफटत नेले

अमरावती : सायकलींगसाठी निघालेल्या सेवानिवृत्त सैनिकाचा क्रेनच्या खाली दबून जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना एमआयडीसी बायपास मार्गावर रविवारी घडली. दुर्योधनबोरकर, वय ६७, राहणार गणपतीनगर असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणपती नगर येथील रहिवासी दुर्योधन बोरकर रोजच्याप्रमाणे सायकलींग करिता निघाले होते. घरापासून काही अंतरावर दूर बायपास मार्गावर मिरची हॉटेल जवळ येताच … Read more

वर्णभेदा विरोधातील लढ्याचा संघर्ष नायक हरपला, डेसमंड टूटू यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकेकाळी वर्णभेदामुळे काही लोकांना त्रास सहन करावा लागतो त्या वर्णभेदाविरोधात आयुष्यभर लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे आज निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. नोबल शांती पुरस्कार विजेते डेसमंड टूटू यांना 1990 च्या दशकात प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. … Read more

विवाहीत प्रेमी युगुलानं असं का केलं? कंपनीतलं काम उरकून रात्री ऊसाच्या शेतात आले अन्..

सांगली : कुपवाड शहरातील कुपवाड-बुधगाव रस्त्यावर असणाऱ्या नांद्रेकर यांच्या मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये एका प्रेमी युगुलांनी विष प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. राजू महादेव माळी व रीना किरण पार्लेकर अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. … Read more

पांडुरंग लोहार – गुरूजी यांचे निधन

कराड | तालुक्यातील तांबवे येथील पांडुरंग तातोबा लोहार – गुरूजी (वय- 75) यांचे शुक्रवारी सकाळी ह्दयविकाराने निधन झाले. उंडाळे भागातील म्हारूगडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. उत्तर तांबवे, किरपे, विंग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी उपशिक्षक म्हणून काम पाहिले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असे. भजनी मंडळात ते हर्मोनियम … Read more

नाल्यात महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ; पोलिसांनी काही तासांत शोधून काढलं..

अमरावती : शहरातील राजापेठ पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या रुक्मिणीनगर परिसरातील नाल्यात एका ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु राजापेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी महिलेची ओळख पटवून तिच्या नातेवाईकांना माहिती दिली. ताजो बी ६५ वर्षीय नूरखाँ राहणार कब्रस्तान जवळ अमरावती असे मृतक महिलेचे नाव आहे. फ्रेजरपुरा पोलिसात सदर महिला … Read more

ड्रेनेजमध्ये सफाईसाठी उतरलेल्या 4 कामगारांचा गुदमरून मृत्यू! एकाला वाचवण्यासाठी दुसरा गेला अन् नंतर तिसरा..चौथा

सोलापूर : महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत अक्‍कलकोट रोडवरील मुद्रा सनसिटी येथे ड्रेनेज स्वच्छतेचे काम सुरु होते. ब्लॉक झालेला ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी उतरलेला एक कामगार खूप वेळ होऊनही परत येत नसल्याने दुसरा कामगार आतमध्ये उतरला. त्या दोघांना वाचविण्यासाठी पुन्हा एकापाठोपाठ चौघे उतरले. मात्र, त्यातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल … Read more

ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक गेल्याने सात वर्षाची बालिका ठार  

पुसेसावळी : चोराडे ता. खटाव येथे ऊसाच्या फडामध्ये अंगावर ट्रक जावुन सात वर्षाच्या बालिका गंभीर जखमी होवुन जागेवर ठार झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद अौंध पोलीस ठाणेत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चोराडे येथील गाउंधर नावचे शिवारातील पांडुरंग निवृत्ती घुटुगडे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु होती. … Read more

ट्रॅक्टरला कार धडकून झालेल्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर जत साखर कारखाना गेट समोर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला आणखीन एका चारचाकी गाडीच्या धडकेत बाप-लेकाचा बळी गेला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातास कोण जबाबदार पोलीस यंत्रणा? का जत साखर कारखाना असा गंभीर प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. विजापूर-गुहागर या मार्गावर राजारामबापू साखर कारखानाच्या गेटमध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टर … Read more

दुर्देवी : बनवडीत ऊसाच्या पाचोळ्याच्या आगीत 11 महिन्याच्या चिमकुलीचा भाजून मृत्यू

कराड |  ऊसाच्या फडात पाचोळ्याला आग लागल्यामुळे झोळीत झोपवलेल्या अकरा महिन्याच्या मुलीचा भाजुन दुर्दैवी मृत्यू झाला. बनवडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. नंदिनी सोमय्या वरवी (रा. निलपाणी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे भाजून मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊसतोड मजुरांची टोळी बनवडी गावात दाखल झाली आहे. … Read more