विरोधकांचा धुव्वा : पुसेसावळी सोसायटीवर श्री हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे वर्चस्व

पुसेसावळी | पुसेसावळी (ता.खटाव) विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चंद्रकांत (दादा) कदम आणि सुर्यकांत कदम (बापु) यांच्या नेतृत्वाखालील श्री. हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे सर्वच्या सर्व 13 जागावर उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी श्री. हनुमान जनशक्ती सहकार पॅनेलचा एकही जागा मिळालेली नाही. विकास सेवा सोसायटीवर चंद्रकांत पाटील व सुरेश पाटील य‍ांचे अनेक वर्षापासुन … Read more

काॅंग्रेसला जोतिबा पावला : कोल्हापूरात जयश्री जाधवांचा पोटनिवडणूकीत विजय

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूकीत पहिल्या फेरीपासून मतमोजणीत आघाडीवर असलेल्या काॅंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी अखेरच्या फेरीअखेर 92 हजार 12  एवढी मते मिळवली आहेत. कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजपाच्या सत्यजित कदम यांच्यावर 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला. काॅंग्रेसचे चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदार संघात पोटनिवडणूक लागली होती, त्यामध्ये पत्नी जयश्री जाधव यांनी … Read more

वेचले सोसायटीवर अजिंक्य पॅनेलची बिनविरोध सत्ता

सातारा | सातारा तालुक्यातील वेचले, शिवाजीनगर गावांसाठी संयुक्त असलेल्या वेचले विकास सेवा सोसायटीवर अजिंक्य पॅनेलने बिनविरोध सत्ता प्रस्थापित केली. चेअरमनपदी प्रमोद जाधव तर व्हा. चेअरमनपदी राहुल खामकर यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वेचले सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व 13 जागा बिनविरोध निवडून आल्या. चेअरमन जाधव, … Read more

मोदींचा ‘सुदामा’ हरला : ‘या’ ठिकाणी निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचे डिपॉझिट झालेय जप्त

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 27 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात भाजपाने या 27 पैकी 24 जागांवर भाजपाने विजय मिळविला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा मतदार संघ असलेल्या वाराणसीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. वाराणसी-चंदौली-भदोही जागेवर भाजपाचे उमेदवार सुदामा … Read more

ऐतिहासिक निर्णय : येणके येथे सर्व निवडणूका बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील येणके येथे ग्रामपंचायत व विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करून यापुढे गावात कोणतीही निवडणूक न घेता सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय गावाने घेतला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून आनंदोत्सव साजरा होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राहुल गरुड तर व्हाईस चेअरमनपदी रामभाऊ कदम यांची बिनविरोध निवड … Read more

किसनवीर कारखान्याच्या आखाड्यात आबा- काकांचा अवैध अर्ज वैध

सातारा | सातारा जिल्ह्यात पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यासाठी प्रचंड गदारोळानंतर आमदार मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आबा- काका या बंधूची जोडी असणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. किसनवीर सहकारी साखर कारखानासाठी 3 मे … Read more

किसनवीर कारखाना निवडणूकीसाठी विक्रमी 347 अर्ज : आ. मकरंद आबा, नितीन काका व मदनदादा रिंगणात

सातारा | पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणार्‍या किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 223 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण विक्रमी 347 अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी आ. मकरंद पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील, मदनदादा भोसले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. आ. महेश शिंदे यांच्या … Read more

भाजपने सहा लाख कार्यकर्ते आणले तरी कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच विजय : उदय सामंत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोल्हापूरच्या निवडणूकीत भाजपाने 3 लाखाऐवजी भाजपचे 6 लाख कार्यकर्ते आणले, तरी पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. कराड येथील शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर येथील पोटनिवडणूकीत … Read more

किसनवीर कारखान्यांचा निवडणूक बिगूल वाजला : सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ

सातारा | भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवारपासून, (दि. 28) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर 3 मे रोजी मतदान व 5 मे रोजी निकाल लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किसन वीर कारखाना बंद आहे. या भागातील शेतकऱ्यांना कारखाना बंदचा फटका बसला असल्याने आता निवडणूकीत … Read more

टेंभू_सयापुर सोसायटीच्या चेअरमनपदी बब्रुवान पाटील बिनविरोध

कराड | टेंभू-सयापूर विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजले पासून यावेळची निवडणूक चुरशीची होणार अशी चर्चा होती. मात्र, दोन्हीकडील नेत्यांनी मेळ घालत अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक बिनविरोध करण्यावर शिककामोर्तब करण्यात आला. यामधे जोतीर्लिंग पॅनेलला पाच वर्षासाठी चेअरमन पदासह सहा जागा दिल्या. तर ग्रामविकास पॅनेलला सात जागा देवून … Read more