DCC Bank : आ. शिवेंद्रराजेंचा पत्ता कटचे कारण आ. शशिकांत शिंदे की पक्ष?

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणूक लागल्यापासून अर्ज भरणे, माघार घेणे, बिनविरोध करणे, मतदान करणे, निकाल लागण्यापासून आज 6 डिसेंबर रोजीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक ट्विस्ट निर्माण झाले किंवा केले म्हणा. परंतु यामध्ये सर्वात मोठा धक्का हा आ. शिवेंद्रसिंहराजेंना एका रात्रीत अध्यक्ष पदाचा पत्ता कट करून दिला आहे. यामध्ये आ. शशिकांत शिंदेंचा … Read more

सातारा जिल्हा बॅंक : नितिन काका पाटील अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई बिनविरोध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्हा बॅंकेचा अध्यक्षपदी वाई सोसायटी गटातून बिनविरोध झालेले कै. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे चिरंजीव व आ. मकरंद पाटील यांचे बंधू नितिन काका पाटील याची वर्णी लागलेली आहे. तर उपाध्यक्षपदी औद्योगिक, विणकर, मजूर संस्था, पाणीपुरवठा संस्था मतदारसंघातून बिनविरोध झालेले अनिल देसाई यांची बिनविरोध निवड लागलेली आहे. आज अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडी अगोदर … Read more

प्रभाग रचनेनेचा कच्चा आराखडा आज होणार सादर

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाकडे महानगरपालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा आज सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य शासनाने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचे ठरवले आहे. त्यातच वाढलेल्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार नगरसेवकांची संख्या वाढवून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश … Read more

कार्यकर्त्यांनो स्वाभिमानाने लढलो, आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा : ॲड. उदयसिंह पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते विलासकाका पाटील जिल्हा बॅंकेचा आर्थिक पाया रचला. काकांनी शेवटच्या श्वासापर्यंत तत्वाशी तडजोड केली नाही. त्यामुळे काकांची विचारधारा पुढे नेण्यासाठी न झुकता स्वाभिमानाने लढलो. यापुढे काॅंग्रेस पक्ष म्हणून संघटनेतील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुका जबाबदारीने लढण्यासाठी सज्ज व्हावे, अशी हाक काॅंग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी व्यक्त केले. सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील … Read more

मनपा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादेत

Raj Thackarey

औरंगाबाद – आगामी औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याच्या भेटीला येत आहेत. येत्या 14 डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ही माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे … Read more

मनसे लढविणार स्वबळावर निवडणूका; बाळा नांदगावकरांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या नवीन घरी भेट दिली. तसेच दोघांमध्ये आघामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चाही झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आगामी महापालिकांच्या … Read more

दहिवडी नगरपंचायतीत शिवसेना सर्व 17 जागा स्वबळावर लढणार : शेखर गोरे

दहिवडी | शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार दहिवडी येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा लढविण्यात येणार आहे. दहिवडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण या वेळी शिवसेनेच्या माध्यमातून पॅनेल टाकत असल्याची माहिती माण-खटावचे शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे … Read more

निवडणूक : पाटण नगरपंचायतीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

पाटण | येथील नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दि.1 रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी दिली. नगरपंचायत निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार … Read more

लोणंद नगपंचायत निवडणूक : काॅंग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीची एकलो चलो रे भूमिका

लोणंद | लोणंद नगरपंचायतीचा गेल्या पाच वर्षात म्हणावा तसा विकास झाला नाही. तुमच्या मनात जी खंत आहे, तीच माझ्या मनात आहे. नगराध्यक्ष आपला नसल्यास विकासकामे होत नाहीत याचा चांगला अनुभव आला. त्यामुळे आता सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादी पक्ष लढविणार असून आपण जागरूक राहून काम केल्यास सत्ता राष्ट्रवादीचीच येणार असल्याचा विश्वास आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त … Read more

बिनविरोध निवड : फलटण पंचायत समितीच्या सभापती विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर

फलटण | फलटण पंचायत समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा वाठार निंबाळकर गणाचे सदस्य श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर तर उपसभापतीपदी सांगवी गणातील संजय भगवानराव सोडमिसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित … Read more