कृषी आंदोलनावर ट्विट: ग्रेटा थनबर्गने तिच्या ट्विटर अकाउंटवरून हटवले ‘हे’ डॉक्युमेंटस, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतातील 3 कृषी कायद्यांविरूद्धच्या चळवळीवरील ट्विटनंतर ग्रेटा थनबर्ग आता एक्सपोज झाली आहे. वास्तविक, 18 वर्षांच्या पर्यावरण एक्टिविस्टने सध्याच्या गोंधळाच्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवर एक डॉक्युमेंट शेअर केला, ज्याचे वर्णन तिने ‘टूलकिट’ असे म्हणून केले आहे. या डॉक्युमेंटद्वारे ग्रेटा थनबर्ग ने भारतात चालू असलेल्या शेतीविषयक चळवळीदरम्यान शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा असे आवाहन केले. या … Read more

दणका! आक्षेपार्ह भाषेत रोहित शर्मावर टीका करणाऱ्या कंगनावर ट्विटरची कारवाई

मुंबई । क्रिकेटपटू रोहित शर्मा विरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सरकार व शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू असताना हा संघर्ष बुधवारी तीव्र स्वरूपात सोशल मीडियावरही … Read more

गाझीपूर सीमेवर सुप्रिया सुळेंसहीत १५ विरोधी खासदारांना पोलिसांनी अडवलं; शेतकऱ्यांच्या भेटीसाठी होते जात

नवी दिल्ली । दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेल्या ७२ दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसहीत १५ विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. अडवण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, द्रमुक खासदार कनिमोळी, अकाली दल खासदार हरसिमरत कौर बादल,खासदार तिरुचि शिवा, सौगत राय यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गाझीपूर सीमेवर निघताना सुप्रिसा … Read more

‘अब की बार ट्रम्प सरकार’ बोंबलत होता? तेव्हा ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का?- आव्हाड

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या पॉपस्टार रिहानाचं कौतुक करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते व भारतातील काही सेलिब्रिटींवर तोफ डागली आहे. नुकतंच अमिरिकेची पॉपस्टार रियाना हिनं याबद्दल एक ट्वीट केलं होतं. भाजपसह देशातील बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनीही विदेशींनी भारतात ढवळाढवळ करू नये, असं म्हणत रिहाना अप्रचार करत असल्याच्या सरकारच्या सुरत … Read more

सरकारची सर्वत्र छी-थू झाल्यावर शेतकऱ्यांसाठी रोवलेल्या खिळ्यांना प्रशासनाकडून काढायला सुरुवात

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी कायदे मागण्यांकडे डोळेझाक करत आंदोलन स्थळावर शेतकऱ्यांशी युद्ध करण्याचाचं पवित्रा घेतला. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळी तटबंदी करत वाटेत अनेक अडथळे निर्माण केले. आंदोलनस्थळावर जाणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी तारांचे कुंपण घातले. जागोजागी रस्त्यांवर खड्डे खोदले. इतकेच नव्हे … Read more

शेतकरी आंदोलनाला प्रोपोगेंडा म्हणणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना तापसी पन्नूचा करारा जवाब

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या प्रदीर्घ आंदोलनाचे पडसाद आंतराष्ट्रीय स्तरावर पडत आहेत. सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना  आणि ग्रेटा थनबर्ग, आदींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीका केली आहे. यानंतर भारतातील कला आणि … Read more

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more

शेतकरी आंदोलनाचा धसका! हरयाणा सरकारने केली इंटरनेट सेवा बंद

नवी दिल्ली । शेतकरी आंदोलन पुन्हा मजबूत होताना दिसताच हरयाणातील भाजप सरकारने काही जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली आहे. शेतकरी नेते राकेश टीकेत यांचा अश्रू अनावर झालेला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर हरयाणातील अनेक गावखेड्यांत भावूक लहर उठून शेतकरी दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकरी जमू लागले आहेत. या गोष्टीचा धसका घेत शेवटी हरयाणा सरकारने तडकाफडकी केली इंटरनेट सेवा … Read more

सिंघू बॉर्डरवर हिंसक जमावाचा शेतकऱ्यांवर हल्ला; स्थिती तणावपूर्ण

नवी दिल्ली । शेतकरी आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर एका जमावानं आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा असताना देखील या जमावाने शेतकऱ्यांवर दगडफेक करत तेथील तंबू उद्धस्त करण्याचा प्रयन्त केला आहे. यावेळी या जमावाने प्रक्षोभक नारेबाजी केली. दरम्यान, या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. … Read more

शेतकरी आंदोलनात मोठी फुट; दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्ली |  येथे 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये दिल्ली पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरती त्यांचा झेंडा फडकावला. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात सहभागी दोन युनियननी शेतकरी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतपणे घोषणा करून या संगठना बाहेर पडल्या आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये झालेल्या संघर्षानंतर, शेतकरी आंदोलनातून राष्ट्रीय … Read more