सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, MSP वर केली 18% अधिक धान्य खरेदी, कोणत्या राज्याचा सर्वात जास्त फायदा झाला हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तीन नवीन कृषी विपणन सुधारणा (Agri Marketing Reform laws) कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी चालू विपणन हंगामात (Kharif Marketing Season) आतापर्यंत 1.16 लाख कोटी रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) धान्याची खरेदी 18 टक्क्यांनी वाढून 614.25 लाख टन झाली आहे. चालू खरीप मार्केटिंग सेशन (KMS) 2020-21 मध्ये मागील … Read more

‘मी चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरही इतका बंदोबस्त पहिला नाही जितका शेतकऱ्यांसाठी केलाय’- राज ठाकरे

मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलंय. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जितका बंदोबस्त नाही, इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी केला जातोय. याची गरज नाही, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. “शेतकरी आंदोलन फार चिघळलं आहे. हे आंदोलन … Read more

राकेश टिकैत यांचे मोदी सरकारला अल्टिमेटम ; शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार

नवी दिल्ली । केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारला आम्ही २ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. सरकारने तोपर्यंत कायदे मागे घेतले नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. जोपर्यंत तिन्ही कृषी … Read more

पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आता फुलं लावणार; २ ट्रक मातीही गावाकडून मागवली! – राकेश टिकैत

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७३ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आंदोलन स्थळावर शेतकऱ्यांशी युद्ध करण्याचाचं पवित्रा घेतला. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळी तटबंदी करत वाटेत अनेक अडथळे निर्माण केले. पोलिसांनी सिमेंटच्या भिंती उभारत दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकून आंदोलन स्थळापर्यंत कोणी पोहोचूच नये अशी … Read more

रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा; काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप सिंगर रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून रिहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. रिहानाचा … Read more

शेतकरी आंदोलनावर सलमान खाननं केलं भाष्य, म्हणाला…

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनावरून जागतिक स्तरावर मोदी सरकाराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा वेळी अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या सुरात सूर मिसळत ट्विटरवरुन सरकारच्या बाजुने आपलं मत मांडायला … Read more

भारतीय मागतायेत टेनिसपटू मारिया शारापोवाची माफी; नेमकं काय आहे कारण घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  26 जानेवारीपासून देशात शेतकरी आंदोलनानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरी जाणार नसल्याचं सरकारला ठणकावत आंदोलन सुरूच ठेवलं असून, आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. तर देशातील कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींनी देशाच्या सार्वभौमत्व व अखंडतेविषयी ट्विट केले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही यासंदर्भात … Read more

शेतकरी देशद्रोही असतील तर भारतात देशप्रेमी कोण ? संजय राऊतांच्या राज्यसभेत सवाल

Sanjay Raut

नवी दिल्ली । ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असं संत तुकारामांनी म्हटलं आहे. पण आज मात्र जो टीका करेल त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, असं शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटलं. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. मग भारतात देशप्रेमी कोण आहे? असा … Read more

ब्रिटनच्या संसदेत शेतकरी चळवळीवर चर्चा करण्यासाठी 1 लाखांहून अधिक लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या

Farmers Protest

लंडन । ब्रिटिश संसदेची याचिका समिती भारतातील शेतकऱ्याचे आंदोलन आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये चर्चा करण्याचा विचार करेल. या मुद्द्यांशी संबंधित ऑनलाइन याचिकेवरील 1,10,000 हून अधिक स्वाक्षर्‍या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरिस जॉनसन यांनी पश्चिम लंडनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार म्हणून या याचिकेवर स्वाक्षरी केल्याचीही चर्चा आहे, परंतु पंतप्रधान कार्यालयाने हे … Read more

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ‘ग्रेटा थनबर्गवर दिल्ली पोलिसांकडून FIR; भावना भडकावण्याचा केला आरोप

नवी दिल्ली । ‘भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही समर्थन देत आहोत’ असं सोशल मीडियावर म्हणणाऱ्या स्वीडनची रहिवासी आणि ‘नोबल पुरस्कार’ विजेती १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी भावना भडकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात १५३ ए, १२० बी सहीत आणखीही काही कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ग्रेटासहीत प्रसिद्ध … Read more