South Africa Riots : द. आफ्रिकेतील हिंसाचार थांबलेला नाही, भारतीय वंशाच्या लोकांना लक्ष्य करुन अनेक शहरांमध्ये केली जात आहे जाळपोळ

केप टाउन । माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना तुरूंगात टाकण्याच्या विरोधात झालेल्या हिंसक निषेधांनी दक्षिण आफ्रिकेत गंभीर स्वरूप धारण केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 72 लोकं मरण पावले आहेत तर शेकडो जखमी झाले आहेत. हे दंगलखोर भारतीय वंशाच्या लोकांना लक्ष्य करीत आहेत. ते त्यांची दुकाने आणि व्यवसायातील घटकांना लुटत आहेत. दंगलखोरांनी शेकडो खरेदी केंद्रे, मॉल्स, … Read more

इंडोनेशियात एका नौकेला लागली आग, समुद्रात उड्या घेऊन लोकांनी वाचविला जीव

जकार्ता । पूर्व इंडोनेशियात शनिवारी पहाटे एका (Ferry) बोटीला आग लागली. या बोटीत क्रू मेंबर्ससह 200 लोकं होते आणि आग लागताच सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाण्यात उड्या घेतलेल्या शेकडो लोकांना वाचवल्यानंतर हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे. समुद्री परिवहन महासंचालनालयाचे प्रवक्ते विष्णू वरदाना म्हणाले की, “केएम काम इंदाह नावाची … Read more

गुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग ः 18 जण मृत्यूमुखी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुजरातमधील भरूच शहरातील पटेल वेलफेयर हाॅस्पीटलमध्ये भीषण आग लागलेली आहे. या आगीच्या घटनेत 18 रूग्ण मृत्यूमुखी पडलेले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्री एक वाजता शाॅर्टसर्किंटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण समजत आहे. कोरोना रूग्णांसाठी असलेले भरूच शहरातील पटेल हाॅस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री … Read more

पुणे बंगळूर महामार्गावरील फर्निचर दुकानाला आग; हायवेलगत आगीचा थरार पहाण्यासाठी लोकांची गर्दी

Fire

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे बंगळूर महामार्गावरील फर्निचर दुकानाला गुरुवारी आग लागली. कराड जवळील मलकापूर येथील लाॅटस फर्निचर दुकानाला आग लागून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचत ही आग आटोक्यात आणली आहे. सदर आग कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या आगीचे रुप इतके भयंकर होते की हायवेलगतचा … Read more

कोरेगावात चप्पल विक्रीच्या दुकानाला आग

सातारा | कोरेगाव येथील साखळी पुलाजवळील एका चप्पल विक्रीच्या दुकानाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने दुकानासह त्यातील मालाचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आग लागली तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता, असेही काही नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातून जाणाऱ्या सातारा-पुसेगाव मार्गावर साखळी पुलाजवळ … Read more

अनर्थ टाळला ः सातारा- पुणे महामार्गावर शिरवळ येथे पेट्रोलच्या टँकरला आग

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रीय महामार्गालगत शिरवळ फुल मळा लगतचा रस्त्यावर 25 हजार लिटर क्षमतेचा भरलेला रिलायन्सचा पेट्रोलच्या टँकरला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ माजली घटनास्थळी शिरवळ पोलीस पांडुरंग हजारे यांनी उपस्थित राहून दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेअकराच्या सुमारास सातारा -पुणे महामार्गावरील शिरवळ … Read more

लासलगाव येथील कांद्याच्या गोदामला भीषण आग

नाशिक | नाशिक येथील लासलगाव निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव – विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामात असलेल्या लाखो रुपयांचा कांदा हा जळून खाक झाला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. इथून कांदा निर्यात देखील केला जातो. सुरणा हे इथले हे … Read more

बिल्डिंगच्याखाली नाल्यात आग ः अग्निशामक दलासह नागरिकांची पळापळ

औरंगाबाद : शहरातील गुलमंडी-पैठणगेट रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या औषधी भवनाच्या बिल्डींगच्याखाली असलेल्या नाल्याला आज सकाळी आग लागली. या आगीमुळे औषधी भवनाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलासह नागरिकांची पळापळ सुरू होती. रविवार बाजार गांधीनगरमार्गे औरंगपु-याच्या दिशेने हा नाला जातो. या नाल्यावर औषधी भवन बांधण्यात आले असल्याने नाल्याखाली पूर्ण कचरा … Read more

पंढरपूर -सातारा रोडवर म्हसवड नजीक पिलीव घाटात भीषण आग ; 100 एकर वनक्षेत्र जळून खाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर -सातारा रोडवर म्हसवड नजीक पिलीव घाटात भीषण आग लागली आहे. या आगीचा जोर एवढा मोठा होता की या आगीत जवळपास 100 एकर वनक्षेत्र जळून खाक झालं आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

साताऱ्यात एसटी स्टॅंडवरील शिवशाही बस पेटवणारा तरुण ताब्यात

सातारा । साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला आगीच्या हवाली करणाऱ्या तरुणाला पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाने एसटी स्टॅंडवर उभ्या असलेल्या बसला आग लावली होती. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर ५ बस गाड्यांनीही पेट घेतला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पेटलेल्या बस गाडया विझवल्या. तरूणाने लावलेल्या आगीत सहाही शिवशाही … Read more