तडफडणाऱ्या बिबट्याचा क्रोनिक न्युमोनियाने मृत्यु : वनविभागाकडून शवविच्छेदन करून दहन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील साजूर येथे ऊसाच्या सरीमध्ये बिबटया तडफडत असताना आवाज आल्याने गावातील लोक हातात काट्या घेवून शेताकडे गेले होते. मात्र बिबटया जागेवरच पडून तडफडत होता.  गावकऱ्यांनी प्राणीमित्र रोहित कुलकर्णी यांना फोन लावला, तेव्हा वनविभाग तातडीने घटनास्थळी पोहचेल. परंतु बिबट्याचा मृत्यू झाला होता, बिबट्याच्या फुफुसास मोठया प्रमाणात जवळ जवळ 80% संसर्ग … Read more

जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांचे प्रस्ताव तयार करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील तसेच पाटण तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीत असलेले अनेक रस्ते अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या मंजुरीकडे अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी सातारा येथील विश्रामगृहात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना सातारा जिल्ह्यातील जे रस्ते वन विभागाच्या … Read more

सातारा शहरा जवळील शाहूनगरमध्ये भरवस्तीत बिबट्या घुसला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहराजवळील शाहूनगर येथे भरवस्तीत बिबट्या शिरल्याची घटना घडली आहे बिबट्या भरवस्तीत भरदुपारी घुसल्याने नागरिकांची पळापळ होऊ लागली. शाहूनगरमध्ये बिबट्या आल्याची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली आहे. सातारा शहरापासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शाहूनगर परिसरात बिबट्या भरदुपारी 2.30 वाजता शिरल्याची बातमी समजताच लोकांनी शाहूनगर कडे … Read more

वनविभागाची कारवाई : लाकडांची अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा | शाहूपुरीजवळ आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने छापा मारून लाकडांची विनापरवाना अवैध वाहतूकप्रकरणी दोन वाहनांसह सुमारे ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा प्रल्हाद वसंतराव शेंडगे (रा. गडकर आळी, सातारा) आणि बाजीराव प्रकाश लोंढे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. वन विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख … Read more

तासगाव तालुक्यात म्हांडूळ साप बाळगल्या प्रकरणी दोनजण वनविभागाच्या ताब्यात

सांगली | धुळगाव येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण व तासगाव वनविभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून बेकायदेशीर मांडूळ बाळगल्याप्रकरणी तनवीर रहामन कामीरकर व फिरोज सलीम मुजावर या दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकामार्फत तासगाव विभागातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग सुरू होते. तेव्हा तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळगाव येथे फिरोज मुजावर याच्या शेतीतल शेडमध्ये निळ्या रंगाच्या … Read more

दुर्देवी ः वीज पडून दहा शेळ्या, एक बोकड जागीच ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दुष्काळाच्या संकटाशी सामना करणाऱ्या माण तालुक्यातील शिरताव आसरा शोधला नि होत्याचे नव्हतं झालं. वीज पडून दगडू नामदेव लुबाळ यांच्या दहा शेळ्या आणि एक बोकड वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शिरताव येथील लुबाळ कुटुंबातील सदस्य दहा शेळ्या व बोकड घेऊन शिवारात आले होते. दुपारी अचानक ढगाळ वातावरणामुळे त्यांनी … Read more

बेलवडे ब्रूद्रुकमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

Bibatya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बेलवडे ब्रूद्रुक येथील शेरी शिवारात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात कुत्रे ठार झाले आहे. गुरुवारी 28 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सदर घटना कैद झाली आहे. याबाबत वनविभागाला कल्पना देण्यात आली. वनविभागाने घटनास्थळाची पाहणी करून … Read more

पट्टेरी वाघ दिसला ! वनविभागाच्या कॅमेऱ्यात वाघाने केलेल्या शिकारीसोबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन राखीव वनक्षेत्रात बुधवारी (दि. 28) रात्री वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाने केलेल्या शिकारीसोबत आढळून आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असून व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे. बुधवारी रात्री  शिकार केल्यानंतर वाघ वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सह्याद्री व्याघ्रच्या कॉन्झर्वेशन रिझर्व्ह … Read more

वनविभागाचे दुर्लक्ष ः रामाच्या डोंगरास दोन दिवसांपासून लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदाची हानी

खटाव | खटाव तालुक्‍यातील अंभेरी, जांब, बिटलेवाडी, रेवलकरवाडी व कोरेगाव तालुक्‍यातील अंभेरी, साप या हद्दीत येणाऱ्या रामाच्या डोंगरास दोन दिवसांपासून लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदा व जीवसृष्टीची हानी झाली आहे. वन विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना येथील निसर्गप्रेमी करत आहेत. या आगीत शेकडो जीव व वनस्पती भस्मसात झाल्या आहेत. या डोंगरावर साग, ऐन, धावडा, शिवण, … Read more

वनक्षेत्रात वणवा लागल्याप्रकरणी वनविभागाकडून दोघांवर गुन्हा

crime

वाई | वाई वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ वाई लगडवाडी (ता. वाई) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लागल्याप्रकरणी भरत सदाशिव महानवर व मेहुल तानाजी महानवर ( रा. लगडवाडी, ता. वाई) यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भरत महानवर व मेहुल महानवर यांनी स्वत:च्या मालकीच्या शेताच्या बांधावर (दि. २० एप्रिल) आग लावली. … Read more