चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय गडचिरोलीतील जनतेच्या हिताविरुद्ध, 250 गावांनी केला निषेध

गडचिरोली |  महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्यांच्या फायद्याचा आहे, असे मत व्यक्त करीत, गडचिरोली जिल्ह्यातील गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारूमुळे अन्याय झालेल्या लक्षवधी महिलांची व्यथा तत्कालीन सरकारने लक्षात घेऊन २०१५ मध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू केली. मात्र यावर पाणी … Read more

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; आठ नक्षलवाद्यांचा खात्मा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. लसी-60 पोलीस पथकाला 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे कोम्बिंग ऑपरेशनवर निघालेल्या पोलीस पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल पोलीस विभागाकडून दोन तासापासून चकमक सुरु आहे. Maharashtra: Bodies of at least six … Read more

डॉ.प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण; लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन पुढील काही महिने पर्यटकांसाठी बंद

गडचिरोली | डॉ.प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील 7 दिवस आमटे यांना ताप व खोकला आला होता. बुधवारी कोरोना टेस्ट केली असता त्यांची RTPCR निगेटीव्ह आली. ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून आज चंद्रपूर ला चेक अप केले असता त्यांचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आला. डॉ. आमटे यांचे सीटी स्कॅन आणि … Read more

भामरागड : गरोदर महिलांच्या आरोग्य सुविधेच्या प्रश्नांबाबत राज्य मानवाधिकार आयोगाची गंभीर दखल

गडचिरोली | भामरागड तालुक्यातील तुरेमर्का गावातील रोशनी पोदाळी या महिलेला प्रसूतीसाठी २३ किलोमीटर घनदाट जंगलातून डोंगर- नदी- नाले पार करत जावे लागले. तसेच बाळंतपण झाल्यानंतर पाच दिवसाच्या बाळासह त्याच मार्गे परत चालत गावी जावे लागले ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. तसेच वेळेवर आरोग्यसुविधा आभावी भामरागड तालुक्यातील गुंडेनूर येथील गरोदर महिला जया रवी पोदाडी … Read more

पहिला झाला आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

गडचिरोली । जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारी रोजी 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार असून त्याची तयारी अंतिम टप्याात आली आहे. 20 जानेवारी रोजी सकाळी ठिक 7.30 वा ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत जिल्हयातील सहा तालुक्यात होणार आहे. चामोर्शी, मूलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा तालुक्यातील 486 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या … Read more

‘दारूबंदीला समर्थन देणाऱ्या गावांचा आकडा एक हजार पार’-ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र

गडचिरोली | जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर १९९३ मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. सलग २७ वर्ष टिकून असलेल्या दारूबंदीला धक्का लागण्याची शक्यता बळावली असता जिल्ह्यातील १ हजार २ गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत. या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, असे पत्र देखील या गावांनी शासनाला लिहिले आहे. सद्या जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

लोक सहभागातून बांधण्यात आला वनराई बंधारा ; उन्हाळ्यात पाणी साठवून ठेवण्याकरिता पूर्वउपाययोजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग , तालुका कृषि अधिकारी कार्यालय एटापल्ली व ग्रामसभा सिनभट्टी यांच्या संयुक्त लोक सहभागातुन वनराई बंधारा बांधण्यात आले आहे. यात सिनभट्टी गावातील लोकांचा सहभाग होता. गावा लगत नाल्याला वनराई बंधारा बांधण्यात आले आहे, या बंधाऱ्याचे महत्त्व उन्हाळ्यात पाणी साठवून राहावे व गावातील शेतकरी, जनावरे, … Read more

पोलीसांसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार 

गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास … Read more

मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे! – देवेंद्र फडणवीस

मुंबई । मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरी … Read more

आता बसा बोंबलत; गडचिरोलीत विलगीकरण कक्षातून पळून गेले ५० मजूर; जिल्ह्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १२ किलोमीटर असलेल्या यवली गावातून ५० मजूर विलगीकरण कक्षातून पळून गेले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घरची आतुरता असल्याने या मजुरांनी नियम धाब्यावर बसवत दवाखान्यातून पळ काढला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढते आहे. मुंबई पुण्यासारखे जिल्हे रेड झोन मध्ये आहेतच पण महाराष्ट्रातील इतर … Read more