अंबानीचे लाड पुरवण्यासाठी गडचिरोलीचे हत्ती गुजरातला हलवणार? काय आहे प्रकरण जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर वनविभागाच्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील प्राणी संग्रहालयात हलविण्यात येणार आहे. कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. ‘अंबानी’ च्या प्रेमापोटी गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव हत्ती कॅम्प बंद करण्याचा घाट राज्य शासनानेच घातल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात … Read more

‘या’ नगरपंचायती तातडीने रद्द करा..१८ नगरपंचायती बेकायदेशीर? जयंत पाटीलांची विधानपरिषदेत मागणी

गडचिरोली : मुंबई महानगरपालिका अधिनियम, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगर अधिनियमन, १९६५ यात आणखी सुधारणा करण्यासाठी सभागृहात मांडलेल्या विधेयकावरील चर्चेत शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आपली मते मांडली. शेकापचे गडचिरोली येथील नेते भाई रामदास जराते यांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती तातडीने रद्द करण्याबाबत त्यांनी यावेळी मागणी … Read more

जावयाला कंत्राट मिळाल्यानंच राष्ट्रवादीच्या आमदाराचे खदानीला समर्थन? गडचिरोलीतील ग्रामसभांचा शरद पवारांना सवाल

Surjagad Atram Pawar

गडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड खाणीतून रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे सुरजागड लोह खाणीचे समर्थन करतो असे सांगणारे अहेरी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचे समर्थन खरोखरच आदिवासींना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आहे की आमदाराच्या जावयाला सुरजागड खदानीतील लोहदगड वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले यासाठी आहे असा सवाल जिल्हा ग्रामसभांमार्फत विचारण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील … Read more

विकासाला अडथळा आणणाऱ्या नक्षली कारवायांचा शासन कठोरपणे बिमोड करेलच; एकनाथ शिंदेचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात ‘सी-६०’ पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक सुमारे चार तास सुरू होती. चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचे कौतुक करत नक्षलवाद्यांना इशारा दिला आहे. … Read more

सुरजागड खदानीविरोधातील आंदोलनाची धग प्रशासनाच्या फुंकरीने विझली?

एटापल्ली (मनोहर बोरकर) : तालुक्यातील सुरजागड लोहखनिज पहाड़ीसह गडचिरोली जिल्ह्यातील इतर 25 खानींची लीज रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक गोटूल समिती व जिल्हा महाग्रामसभाच्या वतीने पुकारलेल्या ठीय्या आंदोलनातील पुढाऱ्यांना पोलिसांनी अटक करून तिव्र जन आंदोलनाची धग फुंकर मारून पेटता दिवा (पनती) विझविल्या प्रमाणे विझविल्याचे समजने खरे ठरणार नाही. गेल्या आठवड्यात आदिवासी नागरिकांनी आयोजित केलेल्या जहाल … Read more

पोखरलेला डोंगर अन् सपाट झालेलं आमचं जंगल डोळ्यानं पाहवत नाहीये; नक्षलप्रभावीत प्रदेशातील जि.प. सदस्याचं भावनिक आवाहन

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथे सुरु असलेलेल्या लोहखदाणीला स्थानिक नागरिक आणि आदिवासींनी विरोध केला आहे. हजारो हॅक्टर जमिन अन् लाखो झाड यामुळे तोडली जाणार आहेत. भारतीय संविधान, पेसा कायदा आदींची पायमल्ली करुन लोहखदान सुरु असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. आमचा विरोध विकासाला नसून पर्यावरणाचा र्‍हासाला आहे. शाश्वत विकासाची मागणी करत आदिवासींनी … Read more

धक्कादायक ! एकमेकांच्या हाताला दोरी बांधून अल्पवयीन प्रेमीयुगुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या

Sucide

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोली तालुक्यातील आरमोरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. मागच्या 5 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अल्पवयीन प्रेमीयुगालाचा मृतदेह शिवनी घाटावर आढळला आहे. हि घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. या दोघांनीही एकमेकांच्या हातात दोरी बांधून गडचिरोली येथील वैनगंगा नदीत उडी घेतली होती, त्यामुळे हाताला दोरी बांधलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळले आहेत. … Read more

धक्कादायक ! अविवाहित इसमाची घरात रहस्यमयरित्या हत्या

murder

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमधील गजबजलेल्या फुले वार्डात एका अविवाहित तरुणाची त्याच्याच घरात रहस्यमयरित्या हत्या करण्यात आली आहे. हि घटना आज सकाळी उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव दुर्योधन रायपुरे असे आहे. रायपुरे हे अविवाहित असून घरात एकटेच राहात होते. त्यांचा पार्टनरशिपमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय होता. दुर्योधन रायपुरे यांना समाजकार्याची आवड असल्याने 4 वर्षापूर्वी लोकांच्या आग्रहास्तव … Read more

धक्कादायक ! पोलीस शिपायाने केली सासऱ्याची गोळी झाडून हत्या

अहेरी : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीतील अहेरी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. अहेरी येथील ‘प्राणहिता’ पोलीस उपमुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने गोळी झाडून आपल्या सासऱ्याची हत्या केली आहे. हि घटना धरमपुरी वार्डामध्ये रात्री 10 च्या सुमारास घडली. गोळी झाडणाऱ्या आरोपी शिपायाचे नाव मनोज गावडे असे आहे. हाती आलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हि भामरागड … Read more

चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा गडचिरोलीतील 500 गावांनी केला निषेध, गडचिरोलीतील व्यसनाधीनतेचेही वाढणार प्रमाण

गडचिरोली | महाराष्ट्र शासनाने चंद्रपूरची दारूबंदी उठविण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा गडचिरोली जिल्ह्यातील ५०० गावांनी निषेध नोंदवित हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. चंद्रपूरची दारू सुरु झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातीलही व्यसनाधीनतेच्या प्रमाणात वाढ होणार असल्याची भीती या गावांनी व्यक्त केली आहे. तसेच हा निर्णय जनतेच्या हिताविरुद्ध असून दारू विक्रेत्याच्या फायद्याचा आहे. मागच्या २७ … Read more