महाबळेश्वच्या आपत्कालीन परिस्थितीत शिवसैनिक प्रशासनाच्या मदतीला

पाचगणी प्रतिनिधी। सादिक सय्यद महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा कहर झाल्याने १८ जागी रस्ता खचला असुन ९ ठिकाणी दरड कोसळली आहे. कांदाटी खोऱ्याचा संपर्कही तुटला असुन रस्ता खचल्याने दळणवळनाचा प्रश्न बिकट झाला आहे. मात्र, अशा बिकट परस्थितीतही शिवसैनिक मात्र तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्या करीता शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाला मदत करत … Read more

संकट काळात सरकार प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे – अजित पवार

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सांगलीत महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची भेट घेत असून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. उपमुख्यमंत्री पवारांनी सांगलीतून दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी … Read more

हवामान बिघाडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पाटण दौरा रद्द; साताऱ्यातूनच पुण्याकडे रवाना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानीही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्यात पाहणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते पुण्याहून कोयनानगरकडे रवाना झाले होते. दरम्यान हवामानात बिघाड झाल्याने त्यांचा दौरा रद्द … Read more

नुकसान होऊन मदत नाही, उलट प्रांताधिकाऱ्यांचे उद्धट वर्तन; वाई तालुक्यातील नागरिक संतप्त

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाई तालुक्यातील जोर-जांभळी गावात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील अद्याप मदत मिळालेली नाही. या ठिकाणी जाण्यासाठी 18 किलोमीटरची पायपीट करावी लागते. तब्बल 5 दिवसांनंतर वाईच्या प्रांताधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी जखमींना तात्काळ मदत करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्यासह नागरिकांनी केली असता त्यांना प्रांताधिकाऱ्यानी उद्धटपणे उत्तर … Read more

पावसाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाख तर पूरबाधित कुटुंबाला 10 हजारांची मदत : विजय वडेट्टीवार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात पावसाच्या, भूस्खलनाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने 5 लाखाची तर पूर बाधित कुटुंबीयांना 10 हजार रुपये तातडीची देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केले. पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे त्यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाटण तालुक्यातील अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते … Read more

घराची भिंत कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी

Wall collaps

हिंगोली : औंढा नागनाथ येथील रहीम चौक परिसरामध्ये राहत असलेल्या इसाखोद्दीन जाहिरोद्दीन खतीब यांच्या घरावर शनिवारी दुपारी तीन वाजता शेजारच्या घराची भिंत कोसळली. यात इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब व त्यांची पत्नी आरेफाबी इसाखोद्दीन खतीब हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या तीन शेळ्यांवर भिंत कोसळून त्या जागीच ठार झाल्या त्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या मुलीचे … Read more

बाधित लोकांचे पुनर्वसन करून पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देणार – नारायण राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाड येथील तळीये गावात पावसामुळे दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तब्बल 40 पेक्षा अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तळीये गावात जाऊन दरडग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर आज भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस … Read more

भूस्खलनातील बाधितांना शासनामार्फत पूर्ण मदत केली जाईल – नाना पटोले

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या गावात प्रशासनाच्यावतीने मदतकार्य केले जात आहे. दरम्यान, यातील वाई तालुक्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देत दौरा केला. यावेळी त्यांनी बाधीत लोकांना शासनामार्फत पूर्ण मदत करण्यात येईल तसेच मदत व पूनर्वसन मंत्री … Read more

राज्य, केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्थांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढगफुटीसद्रूश्य पावसामुळे चिपळूण तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचून एनडीआरएफचे पथक पुण्याहून चिपळुणात रात्री उशिरा दाखल झाली. या ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सकाळी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे आज महाड, चिपळूण या जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी रवाना झाले. केंद्र … Read more

सातारा जिल्ह्यात 379 गावे बाधित; 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता – जिल्हाधिकारी शेखर सिह

सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील 379 गावे बाधित झाली असून 18 जणांचा मृत्यु, 24 जण बेपत्ता झाले आहे. तर 3 हजार 24 पशुधनांचा मृत्यु झाला आहे. याबाबत सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी महत्वाची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात एकूण 1 हजार 324 … Read more