महामार्गावर बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai Mumbai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात आता कार्ड कारवाई केली जाणार आहे. कारण या महामार्गावर बेशिस्तपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांना दिले. तसेच वाहन चालकांना … Read more

नितिन गडकरींची मोठी घोषणा! औरंगाबाद – पुणे अंतर फक्त सव्वा तासात पार होणार

nitin gadkari

औरंगाबाद – औरंगाबाद ते पुणे प्रवास अवघ्या सव्वा तासांत पूर्ण करण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात आणण्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. औरंगाबाद – पुणे द्रुतगती मार्गावर 140 प्रतितास वेगाने वाहने धावू शकणार आहेत. या एक्सप्रेस-वे मुळे मराठवाड्याच्या विकासा मोठी गती मिळेल, असेही गडकरी म्हणाले. 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते … Read more

महामार्गावर चारचाकी गाडी शिकणाऱ्या युवक, युवतीचे नियंत्रण सुटले अन्

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील पुणे- बंगळूर महामार्गाजवळ असलेल्या शिवराज पेट्रोल पंप येथे चारचाकीचा अपघात झाला. युवक आणि युवती चारचाकी गाडी शिकत असताना हा अपघात झाला असून चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहराबाहेर असलेल्या शिवराज पेट्रोल पंप परिसरात असलेल्या सर्व्हिस रोडवर गाडी शिकत होते. यावेळी गाडी शिकत … Read more

महामार्ग भूसंपादनासाठी 20 ते 60% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महामार्गासाठी जमीन अधिग्रहित झाल्यास आता भूखंडधारकांना राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी कृषी (शेत) जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 20 टक्के आणि अकृषक जमिनीचे अधिग्रहण झाल्यास 60 टक्के कमी मोबदला मिळेल. राज्य सरकारने याबाबत जीआर जारी केला असून या निर्णयामुळे भूखंडधारकांमध्ये निराशा पसरली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भूखंडधारकांना मोठा फटका बसणार आहे. यापूर्वी आकृषी जमिनीसाठी … Read more

जुना बीड बायपास आजपासून घेणार मोकळा श्वास

औरंगाबाद – सोलापूर ते औरंगाबाद मार्गे धुळे एनएच 211 अंतर्गत शहराबाहेरून जाणारा महामार्ग आजपासून सर्व स्तराच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. वाहतुकीची कुठलीही कोंडी नसणारा महामार्ग अप्रतिम प्रवासाचा अनुभव देणारा ठरणार आहे. मागील तीन वर्षापासून या महामार्गाचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर चाचणीसाठी मागील पंधरा दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता. आज पासून हा … Read more

नवीन महामार्गाचे काम नियोजनपूर्वक करून गतीने पूर्ण करा : पृथ्वीराज चव्हाण

कराड | कराड शहरात प्रवेश करताना कोल्हापूर नाका या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असते तसेच अनेक अपघात या वळणावर झालेले आहेत. यासाठी इथे दुहेरी उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. यामुळेच वेळोवेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी या पुलाबाबत पाठपुरावा केलेला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत सुद्धा त्यांनी मीटिंग घेऊन येथील महामार्गाची वस्तुस्थिति सांगितली … Read more

महामार्गावर डिझेल चोरी : भुईज पोलिसांकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त व एकजण ताब्यात

Buinj Police Sation

वाई | पुणे- बंगळूर महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनातून डिझेल चोरणारी टोळी भुईंज पोलिसांनी 48 तासात जेरबंद करून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयीत दिपक विलास यादव (वय- 25 रा. पांडे ता. वाई) या आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी फरारी आहेत. त्याच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. याबाबतची माहिती … Read more

खुलताबाद, वेरुळ मार्गावरील अवजड वाहतूकीत बदल

औरंगाबाद – जिल्ह्यातील खुलताबाद आणि वेरुळ या धार्मिक स्थळांना श्रावणमासा निमित्ताने मोठं संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. यावर्षी मात्र कोरोनामुळे धार्मिक स्थळे बंद असली तरी भाविक जातीलच अशी शक्यता असल्याने पोलिसांनी शनिवार व सोमवारी या मार्गावरील जड वाहतूक वळविण्यात आली आहे. • खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा – – औरंगाबादहून कन्नड, धुळ्याकडे जाणारी सर्व जड वाहने … Read more

…तोपर्यंत सातारा ते पुणे महामार्गाची टोल वसुली बंद करा – शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje Bhosle

सातारा । पावसामुळे सातारा – पुणे या राष्ट्रीय महामार्गाची खड्डे पडून चाळण झाली आहे. मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून वाहनचालक आणि प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे. सातारा ते पुणे महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी आणि जोपर्यंत दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी … Read more

कराडजवळ NH- 4 महामार्गावर साचले पावसाचे पाणी; वाहतूक सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गेल्या चार दिवसापासून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे पुणे- बेंगलोर महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आलेले आहे. कराड शहराजवळील कोल्हापूर नाका येथील सागर हॉटेल समोरील NH-4 मार्गावरती एक ते दीड फूट पाणी साचले आहे. मात्र या ठिकाणी वाहनचालकांना कोणतीही सूचना मिळत नसल्याने वाहने अंधारात पाण्यात बिनधास्तपणे … Read more