जालन्यात आणखी एक जवानाचा किरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १४ वर

जालना प्रतिनिधी | जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एक जवानाचा अहवाल आज मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदावर पोहचली आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक,दोन रुग्ण वगळले तर बहुतांशी रुग्ण हे बाहेर जिल्हे … Read more

मैदानात पैलवान नाही म्हणता, मग मोदींना दिल्लीवरून कशाला बोलावता ; शरद पवारांचा फडणवीसांना टोला

आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नव्हतं.

जालन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन, पवारांवरील गुन्ह्याचा निषेध

जालना प्रतिनिधी। शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडी ने दाखल केलेल्या गुन्हयाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडी ने दाखल केलेल्या गुन्हयाचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध करत जालन्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजप सरकार सूडबुद्धीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद … Read more

‘पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार’; मुख्यमंत्री होण्याबाबत दानवेंची सावध भूमिका

जालना प्रतिनिधी | राजकारणात सरपंच पदापासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सगळी पदं भोगून झाली आहेत आता कोणतीही अपेक्षा राहिली नाही आहे. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत पुढे विचार करणार असल्याचं म्हणत रावसाहेब दानवे यांनी आपली मुख्यमंत्री पदाबाबत सावध भूमिका घेत सूचक वक्तव्य केले. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नैतृत्वाखाली राज्यभर महाजानदेश यात्रा करण्यात आली होती. तेव्हा आगामी निवडणुकीत विजय … Read more

विरोधकांच्या सभेतील गर्दीने मंगल कार्यालय देखील भरत नाहीत – मुख्यमंत्री

जालना प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या असताना राज्यभर राजकीय पक्षांच्या यात्रांमध्ये राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांच्या एकमेकांवर फैरी झाडात आहेत. दरम्यान भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेतील आपल्या जालना जिल्ह्यातील भेटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ‘सध्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या यात्रा काढल्या आहेत. पण या यात्रांना जनतेकडून प्रतिसाद मिळत नसून … Read more

गिरीश महाजनला जोड्याने हाणला पाहिजे ; धनंजय मुंडेंची जीभ घसरली

जालना प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची भाषण करताना जीभ घसरली आहे. त्यांनी गिरीश महाजन यांचा उल्लेख पिस्तूलराव महाजन, गिरीजा महाजन असा करत त्यांना थेट जोड्याने हाणले पाहिजे असेच म्हणले त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांचा नाच्या असा उल्लेख … Read more

घनसांगवीत तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जालना प्रतिनिधी |जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने तक्रारदार विलास कोल्हेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना घनसावंगी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात घडली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आत्मदहन करणाऱ्या विलास कोल्हे यांना रोखून ताब्यात घेतले. “वेळोवेळी तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही म्हणून मी हे टोकाचं पाऊल … Read more

शेतकऱ्यांना खुशखबर! महिना अखेरपर्यंत सरकार राज्यात पाडणार कृत्रिम पाऊस

जालना प्रतिनिधी | राज्यातील दुष्काळी स्थितीवर उपाय म्हणून राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी केंद्राच्या विविध विभागाच्या परवानग्या पुढील आठवड्यात घेण्यात येणार असून महिना अखेर पर्यंत कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी रित्या महाराष्ट्रात राबवला जाणार आहे अशी माहिती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना येथे दिली. महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला आहे. शेतात … Read more

रावसाहेब दानवेंच्याबद्दल अद्याप हि शिवसैनिकांच्या मनात विस्तवच

Untitled design

पैठण । प्रतिनिधी पैठण तालुक्यातील शिवसैनिकामध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आज दिसून आले. पैठण येथील आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसैनिकांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मी रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत करतो आणि नंतर आपण प्रचाराच्या कामाला सुरुवात करू या अटीवर शिवसैनिक … Read more

राज्यात युती …..तरी जिल्ह्यात चुरशीची लढत

Untitled design

जालना प्रतिनिधी | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युती घोषित केली. यामुळे आगामी निवडणुकात हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. मात्र जालन्यात शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील तिढा सुटण्याची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील युती जालन्यात दिसणार की नाही यात शंकाच आहे. आगामी निवडणुकांमध्ये जालना लोकसभेची जागा शिवसेनेसाठी … Read more