कराडमध्ये मटका खुलेआम सुरुच, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वीनी सातपुते लक्ष घालणार का?

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरातील विविध समाजातील कुटुंबातील ग्रामस्थांनी व विविध राजकीय पक्षातील व्यक्तींनी, विविध संघटनांनी वेळोवेळी अवैद्य विनापरवाना मटका धंदा बंद व्हावा म्हणून निवेदने, उपोषणे करूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यांसाठी आज कराड मध्ये विविध संघटना च्या वतीने मटका बंद व्हावा यासाठी तहसीलदार कचेरी समोर उपोषण सुरू. कराड शहरात गेले … Read more

कराडमध्ये दिवसाढवळ्या वाळूचोरी जोमात, प्रशासन कोमात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात वाळू उपसावर बंदी असल्याने अनेकजण प्रशासन कधी वाळू उपसाचा निर्णय घेणार याकडे नजरा लावून बसलेले आहेत. मात्र कराड शहरालगत वारंवारं नागरिक वाळूचोरीची तक्रारी करत असूनही दिवसाढवळ्या होणारी वाळूचोरी प्रशासनाला दिसत नाही. त्यामुळे वाळूचोर जोमात आणि प्रशासन कोमात असे चित्र पहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या वाळूचोरी करणारे वाळूचोर आणि महसूल … Read more

ओगलेवाडीत युवकावर खुनी हल्ला; उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ओगलेवाडी ता. कराड येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने युवकावर खुनी हल्ला झाला. यामध्ये सदर युवकाचे मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर जखमी युवकाला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरु असतानाच युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. घटनास्थळी कडेकोट … Read more

‘तान्हाजी’ काढल्याच्या निषेधार्थ कराडमध्ये शिवप्रेमींकडून थिएटर बंद

सध्या अजय देवगणची भूमिका असलेला तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात दीडशे कोटीहून अधिक रकमेचा गल्ला जमवलेला तान्हाजी चित्रपट ऐतिहासिक चित्रपटांचे जुने विक्रम मोडीत काढत निघाला आहे. तानाजी मालुसरे या शिवाजी महाराजांच्या लढवय्या मावळ्याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर राज्यांनीही डोक्यावर घेतल्याचं पहायला मिळत आहे.

मंत्री शंभूराज देसाईंनी पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेत मागितले आशीर्वाद

महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात शपथ घेतलेले पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई प्रथमच कराड शहरात आले होते. यावेळी शंभुराजें देसाई यांनी कराडच्या प्रितीसंगमावरील स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करत पृथ्वीराज चव्हाणांची त्यांनी भेट घेतली.

बाळासाहेब पाटलांच्या मंत्रीपदाचा साताऱ्यात जल्लोष

ज्याच्या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कराडमध्ये फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला.

कराडात मटकाकिंगमुळे गुन्हेगारी फोफावतेय, पोलिस कारवाई करणार का?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात मटका खुलेआम चालू असून त्यांची पाळेमुळे ही कराड व मलकापूर शहरात रूजली असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांत मटकाकिंग यांच्यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले असून गुन्हेगारी फोफावू लागली आहे. या प्रकारामुळे वर्चस्ववाद समोर येत असून खूनाच्या घटनाही घडलेल्या आहेत. तेव्हा पोलिसांनी या व्यवसायाची पाळेमुळे शोधून मटकाकिंगच्या मुसक्या … Read more

कराडच्या मुख्य बाजारपेठेत दुचाकीने घेतला अचानक पेट ; आगीमुळे वाहतुकीला अडथळा

कराड येथील मुख्य बाजारपेठेत रविवारी भरदुपारी होंडा कंपनीच्या ऍक्टिवा दुचाकीने अचानक  पेट घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. 

कराडमध्ये १९७१ सालच्या युद्ध विजयाप्रित्यर्थ ‘विजय दिवस’ समारोहाला सुरुवात

कराड येथे ‘विजय दिवस समारोह’ दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा विजय दिवस साजरा केला जात आहे.

कराडमध्ये प्रीतिसंगमा शेजारीच बेकायदा वाळू उपसा! प्रशासन ढिम्म

जिल्ह्यातील महत्वाचे प्रेरणास्थान असलेल्या कराड येथील प्रीतिसंगमाजवळील कृष्णा नदी पात्रातच बेकायदा वाळू उपसा केला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.