कराड शहरात दिवाळीत पाणी पुरवठा वेळेत बदल

Karad Nagerpalika

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात दिवाळी सणानिमित्त तीन दिवस पाणी पुरवठा वेळेत बदल करण्यात येणार आहे. सोमवार दि. 24 ते बुधवार दि. 26 पर्यंत सकाळच्या पाणी पुरवठा वेळेत बदल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे. कराड शहरात सोमवारपासून पाणी टाकी व पाणी वेळ पुढील प्रमाणे ः- सोमवार पेठ पाण्याची टाकी … Read more

गोटे गावच्या सरपंचपदी रईसा देसाई बिनविरोध

Gote Sarpanch Unopposed

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी गोटे (ता. कराड) गावच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. रईसा मुजिब देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात सिंहांचा वाटा असणारे लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माहिती व … Read more

भैरवनाथ संस्था निवडणुक : वारूंजीसह 6 गावातील राजकारण तापले

Kese Bhairavnath Sanstha

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील तालुक्यातील केसे येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 21 रोजी होत आहे. या संस्थेच्या निवडणूकीमुळे वारूंजी पंचक्रोशीतील राजकारण चांगलेच तापले आहे. स्व. विलासराव पाटील (काका) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या विरोधात सर्व समावेशक पॅनेल अशी लढत होत आहे. तब्बल 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात असून … Read more

कृष्णा नदीकाठी 8 फूटी मगर विश्रांतीला, प्रशासन सतर्क

Crocodile Krishna River

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील टेंभू येथील कृष्णा नदीत 8 फूटी मगरीचा वावर वारंवार दिसून येत आहे. काल चक्क या मगरीने नदीकाठी विश्रांती घेतली. तिचा व्हिडिअो मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता टेंभूसह परिसरातील गावातील ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून भल्या मोठ्या मगरीचा वावर असून या मगरीचे दर्शन … Read more

कराड शहरातील घंटागाड्याचा बंद : ठेकेदारामुळे कराडकर वेठीस, कारवाईची गरज

Karad Municipal Gantagadi

कराड | कराड नगरपालिकेच्या कचरा गोळा करण्याचा ठेका असलेल्या ठेकेदाराची मनमानीपुढे कराडकर वेठीस धरले गेले. सकाळ- सकाळी पळणाऱ्या घंटागाड्या एका जागेवरच थांबवण्यात आलेल्या आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने तसेच गेले दोन वर्ष बोनस न मिळाल्याने आज घंटागाड्या जागेवरच उभ्या राहिल्या. कराड नगरपरिषद स्वच्छ सुंदर शहर म्हणून देशपातळीवर झळकली आहे. यामध्ये स्वच्छता कर्मचारी व … Read more

स्वच्छ- सुंदर नव्हे तर खड्ड्यांचे शहर म्हणून आता कराडची ओळख?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वच्छ सुंदर शहर स्पर्धेत देशपातळीवर बाजी मारणाऱ्या कराड शहरात तुमचे स्वागत करण्यासाठी खड्डेच- खड्डे आहेत. शहरात कोणत्याही रस्त्याने तुम्ही प्रवेश कराल, तेथे तुमच्या स्वागतासाठी मोठ- मोठे खड्डे आहेत. शहराच्या प्रवेशाद्वारावर अपघात होवून अनेकजण जखमी होत आहेत. आता एखाद्याचा जीव जाण्याची वेळ पालिका पाहतेय का? अन् शहरातील मेहरबानही केवळ आगामी निवडणुकीकडे … Read more

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात शिवम्ं प्रतिष्ठानतर्फे अन्नदान : रोटरी, संजीवनी इन्स्टिट्यूट, आशा भवनला मदत

Food donation Shivam Pratishthan

कराड | सनदी अधिकारी आणि शिवम्ं प्रतिष्ठानचे प्रमुख इंद्रजीत देशमुख यांच्यावतीने येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात रोटरी क्लबच्या सहकार्याने अन्नदान करण्यात आले. त्याचबरोबर येथील संजीवनी इन्स्टिट्यूट आणि कोडोली- सातारा येथील आशा भवन मतिमंद मुलांच्या शाळेला आर्थिक मदत करण्यात आली. ज्यांच्या वाणीतून महाराष्ट्रातील तरुणाईला उर्जा मिळाली, अनेकांना दिशा गवसली, व्यसनात अडकलेले कितीतरी लोक व्यसनमुक्त झाले, असे … Read more

युवा महोत्सावात साताऱ्याच्या महाविद्यालयांचे वर्चस्व

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात 42 वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सावात जिल्ह्यातील 46 महाविद्यालयातून 1 हजारावर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. युवा महोत्सावात साताऱ्याने आपले वर्चस्व राखले. सातारच्या 4 महाविद्यालयांनी 6 सांघिक स्पर्धात प्रथम क्रमांक पटकावत डंका वाजवला आहे. तर तीन स्पर्धांमध्ये कराडच्या दोन महाविद्यालयांनी बाजी मारली आहे. … Read more

प्रवासी वाहनांकडून मनमानी भाडे आकारल्यास कारवाई होणार : चैतन्य कणसे

सातारा | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील त्या- त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बसेससाठी येणाऱ्या प्रती कि. मी. भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही. कमाल भाडे दर शासनाने दि. 24 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चीत केले आहे. त्यामुळे कोणी मनमानी पध्दतीने भाडे आकारणी केल्यास … Read more

नाना पाटेकर म्हणाले, माझी आई माझ्याकडे राहत नव्हती…

कराड | माझी आई 99 वर्षाची होवून चार वर्षापूर्वी गेली. मला लोक विचारायचे नाना तुमची आई तुमच्याकडे राहते का? तेव्हा मला आईने 67 वर्ष आईने सांभाळले. परंतु या प्रश्नावर मी म्हणायचो माझी आई माझ्याकडे राहत नाही, तर मी म्हणायचो मी आईकडे राहतो. आपण एवढे कधीच मोठे होवू शकत नाही, की आपण आई- वडिलांना सांभाळू शकू. … Read more