कराडला युवासेनेची स्वाक्षरी मोहिम : वेदांता प्रकल्पावरून शिंदे- फडणवीस सरकारचा निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर शिवसेना व युवासेना याच्याकडून वेदांता- फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे- फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यासाठी कराड बसस्थानकासमोरील चाैकात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थी, नागरिक यांनीही सहभागी होत स्वाक्षरी करत राज्य सरकारचा निषेध केला. कराड येथे स्वाक्षरी मोहिम शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, दिलीप यादव, संजय … Read more

शारदीय नवरात्रोत्सव 2022 : आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून दैत्यनिवारणी मंदिर परिसराचा आढावा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे, कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर, यंदाचा हा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या सर्वांचा विचार घेऊन, कराड येथील प्रसिद्ध दैत्यनिवारणी मंदिर व मंदिर परिसराचा आढावा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतला. याप्रसंगी डी. वाय. एस. पी. … Read more

…तर मंत्रालयासमोर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र जमा होईल : डॉ भारत पाटणकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील धरणग्रस्तांच्या शेतीला पाणी, मुलांना पाच टक्के नोक-या, निर्वाहभत्ता, येत्या मे महिन्यापर्यंत जर मिळाला नाही तर मुंबईत मंत्रालयासमोर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र जमा झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला आहे. कराड येथील पलाश मंगल कार्यालयात डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमिक मुक्ती … Read more

भाजपा युवा मोर्चाच्या घरगुती गौरी- गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना 1 ग्रॅम गोल्ड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश व युवा विकास प्रतिष्ठान, कराड यांच्या वतीने आयोजित घरगुती गौरी- गणपती सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कन्याप्रशाला मंगळावर पेठ येथे पार पडला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड जिल्हा संघचालक डॉ. मकरंद बर्वे, युवा विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू काका पाटसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कराड … Read more

मसूर दरोड्यातील टोळीला मोक्का : चोरीचे दागिने घेणाऱ्या सोनारही आरोपी

Umbraj Police

कराड | तालुक्यातील मसूर येथे मार्च महिन्यात दरोडा घालणाऱ्या आंतर जिल्हा टोळीसह दरोडेखोरांकडून सोने विकत घेणाऱ्या सोनाराविरुद्ध मोक्का लावण्यात आला आहे. अप्पर पोलिस महासंचालकांकडून दोषारोप पाठविण्यास मंजुरी मिळाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व पथकाने केलेल्या तपासाला यश आले असल्याची माहिती उंब्रजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली. या प्रकरणातील होमराज ऊर्फ … Read more

कोळेवाडी शाळेच्या शिक्षिका शोभा चव्हाण यांचा सन्मान

कराड | कोळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका श्रीमती शोभाताई अरुण चव्हाण यांना ‘रोटरी क्लब ऑफ मलकापूर’ यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड – 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी हा शिक्षक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड असे … Read more

‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ डाॅ. शिवाजीराव कदम यांना जाहीर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा ‘आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान समारंभ शनिवार, दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी (आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या 14 व्या ‘स्मृतिदिनी’) सकाळी 11 वाजतां यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे आयोजित करण्यात आला आहे. सन 2022 चा पुरस्कार भारती … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर इंदोली फाटा येथे नविन ब्रिज जवळ आज सकाळी सातारा ते कराड लेनवरती आयशर चालकाचा ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडीवरील ताबा सुटल्याने पुढे चालेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत आयशर गाडी रस्त्यावर जागेवरच फीरली असता त्याच्या मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने आयशरला जोरात धडक दिली. त्या पाठोपाठ चारचाकी कारने … Read more

मुलाकडून आईला लाकडी दांडक्याने मारहाण

Karad Police

कराड | संसारोपयोगी साहित्य घेऊन घराबाहेर राहण्यास निघालेल्या मुलाला अडविल्यानंतर मुलाने आईला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच पत्नी व भावालाही त्याने शिविगाळ करीत दांडक्याने मारले. उत्तर पार्ले, ता. कराड येथे सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उषा अरुण मदने (रा. उत्तर पार्ले, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. विकास … Read more

कराडला दोन दिवसीय इनरव्हील महिला महोत्सवाचे आयोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या वतीने कराडमध्ये इनरव्हील महिला महोत्सव कराड 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना एकत्र करून त्यांच्यातील विविध कौशल्यांना वाव मिळावा, हा या महिला महोत्सवाचा हेतू आहे. कराड मधील हा पहिलाच महिला महोत्सव आहे. यामध्ये महिलांच्या साठी विविध स्पर्धा, पुरस्कार, स्त्री सन्मान सोहळा, व आकर्षक बक्षिसे … Read more