राज्यातल्या अनेक जागांवर राष्ट्रवादीने केला ‘कमबॅक’

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी विजयाचा विडा उचलला होता. त्यानी राज्यभरात अनेक दौरे केले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील त्यांना मोठी साथ दिली होती. राज्यातील त्यांच्या झंझावाती प्रचाराला मोठं यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे.

महायुतीच्या पाच मंत्र्यांचा पराभव; फडणवीसांना धक्का!

राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे. भाजपा, शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला दुहेरी धक्का बसला आहे. ‘अब की बार २००पार’ ची घोषणा देणाऱ्या महायुतीला पावणे दोनशेचा आकडा गाठण्यातही अपयश येताना दिसत आहे. त्यातच फडणवीसांच्या मंत्रिमंडळातल्या पाच सहकाऱ्यांचा पराभव झाला आहे.

कोल्हापूर दक्षिण मध्ये ‘आमचं ठरलंय’ पॅटर्न यशस्वी,’काँग्रेस’चे ऋतुराज पाटील विजयी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमधून जवळपास सर्वच लढतींचे चित्र आता हळू हळू स्पष्ट झाले आहे. अपेक्षेप्रमाणे राज्यातील अनेक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी देखील युतीला जोरदार टक्कर दिली आहे. दरम्यान सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापुर दक्षिण मध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना आपला गड राखण्यात अपयश आले आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा पराभव करत ‘भाजपा’ला जोरदार धक्का दिला आहे. ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिक यांचा तब्बल ४२,९६४ मतांनी पराभव करत सतेज पाटलांचे ‘आमचं ठरलंय आता दक्षिण उरलय ‘ खरं करून दाखवलं आहे.

‘ज्याने मोठं केलं त्यालाच उदयनराजे विसरले’; श्रीनिवास पाटील यांची निकालानंतरची प्रतिक्रिया

सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा दणदणीत पराभव करत श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. हा जनतेच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा विजय असून ज्या व्यक्तीने आपल्याला मोठं केलं त्या व्यक्तीलाच उदयनराजे विसरले, आणि याचाच फटका त्यांना बसला असल्याचं श्रीनिवास पाटील म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत मतदारांची ‘नोटा’ला पसंती

आज संपूर्ण राज्यात विधानसभा जागांसाठीचे निवडणूक निकाल जाहीर होत आहेत. देशाचे संविधान प्रत्येक मतदाराला निवडणुकीत आपला उमेदवार निवडण्याचा जसा अधिकार आहे. त्याप्रमाणे उमेदवार नाकारण्याचा सुद्धा अधिकार ‘नोटा’ बटनामुळे मतदाराला मिळतो. याच नोटा बटणाचा सर्वाधिक वापर यंदाच्या निवडणुकीत वापरल्याचा एक आश्चर्यकारक आकडा आता समोर आला आहे.

बीड जिल्ह्यात भाजपने खाते उघडले !!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. अशातच आता बीडमध्ये देखील भाजपने आपलं खातं उघडलं आहे. गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार आणि केजमधून नमिता मुंदडा यांनी विजय मिळवत भाजपचं बीडमधील खातं उघडलं आहे.

पराभवानंतर पंकजा मुंढेंची पहिली प्रतिक्रिया..

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या महत्वाच्या निवडणुकी पैकी परळीतील धनंजय विरुद्ध पंकजा लढत होती. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर निकाल हाती आला असून, धनंजय मुंडे यांनी पंकजा यांचा दणदणीत पराभव केला आहे. हा निकाल समोर आल्यानंतर भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आपला पराभव मान्य केला असून, ‘आपल्याला जनतेने दिलेला कौल मान्य’ असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

शिक्षण मंत्री आशिष शेलार बहुमताने ‘पास’!

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शेलार २५ हजार ९०० पेक्षा जास्त मताधिक्यान विजयी झालेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. वांद्रे पश्चिम सारख्या बहुभाषिक मतदारसंघात कोणे एके काळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१४ मध्ये भाजपन खेचून आणलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.

गादीची प्रतिष्ठा नसणाऱ्या राजाला जनता नाकारणारच होती – शरद पवार

प्रत्येकवेळी सत्ता असली की आपल्याला वाटतं तेच खरं असं नाही हे आता भाजपला कळून चुकलं असेल. पक्षांतर केलेल्या लोकांना जनतेने नाकारलं असून लोकांना आता राजकारण कळू लागलं आहे असं म्हणत शरद पवारांनी विधानसभा निवडणूक निकालांचं स्वागत केलं आहे.

कलम ३७० चा प्रचार भाजपवर उलटला

लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामा हल्ल्याचा वापर करून सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं खरं. न भूतो न भविष्यती अशा प्रकारे कामगिरी करत भाजपने ३५० जागा काबीज केल्या. परंतु २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपची ही डाळ शिजली नाही. राज्यात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनी जवळपास ७० हुन अधिक सभा घेत काश्मीरचा प्रश्न मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.