मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील – फडणवीस 

मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही  माहिती दिली होती. ही  माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण … Read more

मजुरांच्या ट्रेनचा खर्च राज्यानं दिला; फडणवीसांच्या दाव्याची महाविकास आघाडीने केली पोलखोल

मुंबई । राज्यात काही दिवसांपासून मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रमिक रेल्वेचा खर्च केंद्रानं उचलला असा दावा केला होता. फडणवीस यांनी या केलेल्या दाव्याची महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेऊन पोलखोल केली. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

केंद्राने हक्काचेही पैसे दिले नाही, अन फडणवीस हवेतील आकडे दाखवतात- अनिल परब

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्राला केंद्राकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची माहिती देऊन अभासी चित्रं निर्माण केलं आहे. मात्र, वास्तव चित्रं वेगळच आहे. केंद्राकडेच राज्याचे ४२ हजार कोटींचा निधी थकीत असून करोना संकटाच्या काळातही हा निधी राज्याला मिळालेला नाही. राज्याला केंद्राकडून हक्काचेही पैसे दिले जात नाहीत, मात्र फडणवीस हवेतील आकडे दाखवून अभासी … Read more

मागील ५ वर्ष राज्याला कर्जबाजारी करणाऱ्यांनी, कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये- नवाब मलिक

मुंबई । राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे ज्यांनी उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये. त्यांच्या सल्ल्याची महाविकास आघाडी सरकारला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी … Read more

पुढील ५ वर्ष सरकारला काही धोका नाही- संजय राऊत

मुंबई । भाजप राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याची प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. अशा वेळी महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील 5 वर्ष सरकार मजबूत आहे. २०२५ पर्यंत कोणताही धोका अजिबात नाही. १७० आमदार आघाडी सरकारच्या बाजूने आहेत. यात वाढ … Read more

महाविकास आघाडीचं पॅकेज ऐकून भाजपचे डोळे पांढरे होतील – हसन मुश्रीफ

कोल्हापूर । आमचं सरकार बारा बलुतेदार आणि कामगारांसाठी मोठं पॅकेज जाहीर करेल तेव्हा भाजपचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे. त्यामुळं केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याचे संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. भाजपने महाराष्ट्रात ५० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्याची मागणी … Read more

सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना सल्ला, आघाडीतून बाहेर पडण्याची ‘हीच ती वेळ’ अन्यथा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची महाराष्ट्रातील निवडणूक आणि विशेषतः निवडणूक निकालानंतरची मुख्यमंत्री पदाची निवड होईपर्यंतचा काळ चांगलाच गाजला आहे. अनेक चढ-उतारांनी या निवडणुकीने देशभरात चर्चेला कारण दिले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रोज नव्याने त्यांच्यावरच्या टीका आणि त्यांना दिले जाणारे सल्ले चर्चेत येत असतात. याच चर्चांमध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी एक नवा मुद्दा दिला … Read more

कोरोना संकटात भाजप आंदोलनाच्या मूडमध्ये; ‘महाराष्ट्र बचाव’ म्हणतं करणार सरकारचा निषेध

मुंबई । कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आता राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २२ तारखेला ठाकरे सरकारविरोधात हल्लाबोल करणार आहे. ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलना अंतर्गत घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, … Read more

आम्ही’पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते पण आता.. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

मुंबई । देशासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काहीजण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली. तर काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही ‘पुन्हा प्रयत्न करू’ असे अनेकांना वाटत होते, पण अशांच्या हाती अपयश आले आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा … Read more

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा फैसला आता मुंबई हायकोर्टात; याचिका दाखल

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरून राज्यावर राजकीय अस्थिरतेचे ढग असतानाच याप्रश्नी आज मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीवर निर्णय घेण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दिरंगाई करत आहेत. भाजपच्या राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक मागील २० दिवसांपासून हा विलंब केला जात … Read more