सातारा | फलटणचा लाल दिवा कसा काढून घ्यायचा, हा विचार आमच्या इथल्या आमदाराच्या डोक्यात येत होता. तेव्हा जवळचे कनेक्शन कुठून जाते तर ते औंधमधून जाते. कारण बारामती- औंध कनेक्शन लय जोरात आहे. या बहाद्दराने ताईच्या कानात सांगितलं तुम्हांला कारखाना गिप्ट देतो. ताईला कारखाना गिप्ट दिला. जरंडेश्वर कारखाना टेंडर न भरता गेला. मी सत्य बोलत आहे. अमर प्रेम एवढं उठल होत, की त्या प्रेमाला जागृत राहून तो कारखाना नावावर केला. जसा शहाजानं मुमताजच्या नावानं ताजमहाल बांधला तसा आमचा जरंडेश्वर कारखाना 27 हजार शेतकऱ्याचे शेअर्स खावून स्वतः च्या प्रेमाच्या पायात हस्तांतरीत केला, असल्याचा आरोप आ. महेश शिंदे यांनी केला आहे.
आ. शशिकांत शिंदेच्या “त्या” वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी आणले घोडे
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काही दिवसांपूर्वी किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीच्या सभेच्या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी नाव न घेता शिवसेना आमदार महेश शिंदे यांना टोला लगावला होता. यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने शेवटचा टप्पा गाठला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी … Read more