आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला जर सर्व तपास यंत्रणांचे मालक आपणच आहोत असे मानून चालत असेल तर लोकशाहीत मालक बदलत असतात. हे भाजपने व त्यांचे राजकीय हुकूम ऐकणाऱ्या यंत्रणांनी पक्के लक्षात घेतले पाहिजे. २५ कोटींचे वसुली प्रकरण हे हिमनगाचे एक टोक आहे. मालक व त्यांच्या नोकरांनी सावध राहावे. आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 … Read more

ड्रग्स केस: ‘खंडणी’ प्रकरणात NCB ने दिले चौकशीचे आदेश, समीर वानखेडे म्हणाले -“मी तयार आहे”

मुंबई । अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आणि आरोपी आर्यन खानसह एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांना सोडण्यात आल्याचा आरोप करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने क्रूज ड्रग्स प्रकरणात साक्षीदाराने केलेल्या दाव्यांच्या पाळत ठेवण्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे आणि इतरांनी 25 कोटी रुपये घेतले होते. उत्तर विभागातील एनसीबीचे उपमहासंचालक (DDG) ज्ञानेश्वर सिंग त्यांच्या मुख्यालयात … Read more

नवाब मलिकांचे वानखेडेंवर गंभीर आरोप, जयंत पाटील म्हणतात या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागले आहे. Ncb अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून नोकरी मिळवली असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. तसेच त्यांनी ट्विट करत वानखेडे यांचे जन्म प्रमाणपत्र उघड केलं. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकारणावर भाष्य करत … Read more

नवाब मलिकजी, माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी भंग करु नका; समीर वानखेडेंचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील फोटो आणि जात प्रमाणपत्र ट्विट करत समीर वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. यानंतर समीर वानखेडे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. नवाब मलिक यांनी माझा व माझ्या कुटुंबियांचा सामाजिक माध्यमांवर … Read more

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ?? खात्यांतर्गत चौकशीसाठी दिल्लीचे बोलावणं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केल्यानंतर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याअनुषंगाने त्यांना दिल्लीला बोलवण्यात आले असून त्यांची खात्यांतर्गत चौकशी होणार असल्याचे एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. क्रुझवरील धाडीत पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर … Read more

सुशांत सिंग प्रकरणात नामांकित, राज कुंद्राशी लिंक आणि आता आर्यन खान प्रकरणात NCB कार्यालयात दिसलेला कुणाल जानी कोण आहे ते जाणून घ्या

मुंबई । क्रूझवरील ड्रग्‍स प्रकरणात रविवारी आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. यापूर्वी, बेपत्ता असलेल्या केपी गोसावीचा कथित बॉडीगार्ड प्रभाकर सेलने NCB वर डील केल्याचा आरोप केला होता, आता त्याचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, कथित फरार साक्षीदार केपी गोसावी NCB कार्यालयात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा ऑडिओ रेकॉर्ड करताना … Read more

समीर वानखेडेंच्या समर्थनासाठी आता पत्नी क्रांती रेडकर मैदानात; केले हे महत्वाचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. यानंतर विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरून आता समीर वानखेडे यांची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर हिने ट्विट करीत संताप … Read more

माझ्या मूळ गावी जा आणि जन्मदाखला तपासा; वानखेडेंचे मलिकांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आर्यन खान ड्रग प्रकारणानंतर राज्यातील वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि ncb अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी समीर यांच्या लग्नाचा जुना फोटो ट्विट करत पहचाना कोण असा सवाल केला होता त्यावर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत मलिकांवर पलटवार केला आहे. … Read more

मलिकांकडून फक्त इंटरव्हलपर्यंतची कथा, त्याच्यानंतरची मी सांगणार; संजय राऊतांच्या इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई-गोवा क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणात दररोज अनेक नवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या दरम्यान प्रभाकर साईल यांचा व्हिडीओ आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातीळ अधिकारी समीर वानखेडे यांनी आतापर्यंत नवाब मलिक … Read more

समीर दाऊद वानखेडेचा फर्जीवाडा इथूनच सुरु होतो; फोटो ट्विट करत मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकत अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक केली होती. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव चर्चेत आले आहे. वानखेडे यांच्या विरोधात अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले आहेत. त्यांनीआज एक … Read more