सातारा जिल्ह्याला पुढील 4 दिवस हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

सातारा | हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस (दि. 11 सप्टेंबर पर्यंत) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे. जिल्ह्यात दि. 11 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाऊस पडतेवेळी झाडाखाली … Read more

सातारा जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यात पावसाची जोरदार हजेरी

सातारा | गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. कोरेगाव, फलटण व माण- खटाव या दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यासोबत कराड, पाटण भागातही काही काळ पावसाने हजेरी लावली. तर आदर्की परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने विजेच्या गडगटासह पाणी पाणी केले. सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा, वाई, … Read more

भाडळेत वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

कोरेगाव | भाडळे (ता. कोरेगाव) येथे काळवट नावाच्या शेत शिवारात वीज पडून संभाजी सीताराम निकम (वय- 60) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला. भाडळे गावात दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली होती. भाडळे येथे जोरदार आलेला पाऊस थांबल्यानंतर काळवट नावाच्या शिवारात संभाजी निकम यांचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. या घटनेची … Read more

कोयनाकाठी सावधान : धरणातून उद्या 30 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग होणार

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पुढील तीन दिवस हवामाना खात्याने अति पर्जन्यमान होणेची पूर्व सुचना दिली आहे. त्यामुळे उद्या रविवारी दि. 14 रोजी धरणातून 6 वक्र दरवाजे 4 फूट 6 इंचाने उचलून 30 हजार 100 क्युसेस पाणी सोडण्यात  येणार असल्याचे कोयना … Read more

कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले : नदीपात्रात 10 हजार 100 क्युसेस पाणी सोडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे आज शुक्रवारी धरणात 87.60 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 49 हजार 524 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर आज शुक्रवारी दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता धरणाच्या सहाही दरवाजे उचलून … Read more

लोणंद -वीर-सासवड मार्गावरील नीरेचा पूल पाण्याखाली, वाहतूक बंद

लोणंद | सातारा जिल्ह्यात सर्वच धरणात क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणे भरण्यास सुरूवात झाली आहेत. तर वीर धरण 100 टक्के भरले असल्याने धरणातून नीरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रात पाण्यात वाढ झाली असून लोणंद -वीर-सासवड रोडवरील वीर धरणाच्या खालच्या बाजूचा जुना नीरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाहतूक … Read more

कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून उद्या पाणी सोडणार : नदीकाठी सावधानतेचा इशारा

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 85.21 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 55 हजार 477 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. उद्या शुक्रवारी दि. 12 रोजी 8000 क्युसेस पाणी मुख्य दरवाजातून … Read more

कोयनेतून आज पाणी सोडणार, धरण 80 टक्के भरले

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे धरण 83.50 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 50 हजार 873 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून आज गुरूवारी दि. 11 रोजी दुपारी 3.00 वा. 2100 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे. गेल्या … Read more

वीर धरण 100 टक्के भरले : कोयनेत प्रतिसेंकद 59 हजार क्युसेस पाण्याची आवक

Uramodi Dam

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेलेल वीर धरण आज सकाळी 8 वाजता 100 % भरले आहे. त्यामुळे नीरा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून तो 15 हजार 11 इतका करण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 800 क्युसेस व डावा कालवा विद्युतगृहातुन … Read more

सातारा जिल्ह्यातील 5 धरण, प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू : नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 50 हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून 4.29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम बलकवडी धरण यामधून पाण्याचा … Read more