‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’- राम शिंदे

मुंबई । दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातही राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न व दूध दराच्या मुद्द्यावरून राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’ हे सरकार कधीही कोसळेल, … Read more

कर्जत-जामखेडमध्ये घडले ‘महाराष्ट्र धर्मा’चे दर्शन; राम शिंदेंनी बांधला रोहित पवारांना फेटा !

विशेष प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवत आपले स्था कायम राखले. दरम्यान यामध्ये संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या लढतींपैकी एक लढत होती ती कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादीचे रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे यांच्यातील. पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रोहित … Read more

कर्जत-जामखेडमधून रोहित पवार ‘सुसाट’; राम शिंदे पिछाडीवर

शाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे राम शिंदे यांना रोहित कडवी लढत देत आहे

आम्हाला लै कॉन्फिडन्स हाय,निवडून येनार तर रोहित दादाच! कार्यकर्ते जोमात

विधानसभा निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यात दुरंगी लढत झाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तसाचा अवधी राहिलेला असताचा कर्जत जामखेड तालुक्‍यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आले असल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी आधीच लावले आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी डिजेसाठी ऍडव्हान्स दिला असुन काहींनी थेट सट्टा लावला आहे.

आम्हाला विकत घेतो काय? शेतकर्‍यांच्या पोरांचा सुजय विखेंना २ हजाराचा चेक

तुमच्या २ हजार रुपयांची भीक आम्हाला नको अस उत्तर देतानाच शेतकऱ्याने २ हजार रुपयांचा चेकही सुजय विखेंच्या नावाने पाठवला आहे.

अपक्ष रोहित पवारांचा अर्ज छाननीत बाद

कर्जत प्रतिनिधी |कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांचा डमी म्हणून रोहित पवार या कर्जतचा रहिवाशी असणाऱ्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्जाला जोडून देण्यात आलेले प्रतिज्ञा पत्र अपूर्ण असल्याने रोहित पवार यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. २२७ कर्जत-जामखेड विधानसभा … Read more

रोहित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राम शिंदेंच्या पीए सह ‘या’ भाजप नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. कर्जतचे पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्या पीए ने राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राम शिंदेंना मोठा धक्का बसलाय. पवार हे कर्जत विधानसनभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवत आहेत. त्याअनुषंगाने पवार यांनी मतदार संघात जोरदार फिल्डिंग लावल्याचं बोललं जातंय. सोमवारी … Read more

रस्त्यांची कामे करणे म्हणजे विकास नव्हे ; रोहित पवारांचा राम शिंदेना टोला

कर्जत प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यावर कडवी टीका केली आहे. मतदारसंघात रस्ते झाले म्हणजे विकास झाला असे म्हणता येणार नाही. येथील पाण्याचा आणि महिला , तरुणवर्गाचा रोजगाराचा प्रश्न बिकट आहे असे रोहित पवार म्हणाले आहेत. राम शिंदे यांच्या विरोधात आघाडीचे संभाव्य उमेदवार असणारे रोहित पवार … Read more

कर्जत जामखेड : रोहित पवारांना धक्का ; राष्ट्रवादीच्या ताकतवान स्थानिक महिला नेत्या भाजपच्या वाटेवर

अहमदनगर प्रतिनिधी |  शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवण्यात त्यांचे प्रतिस्पर्धी राम शिंदे यशस्वी होताना दिसत आहे. कारण राम शिंदे स्थानिक राष्ट्रवादी संघटनात्मक दृष्ट्या खीळखिळा करण्याच्या तयारीत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होण्याआधी राष्ट्रवादीतून कर्जत जामखेड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असणाऱ्या मंजुषा … Read more

रोहित पवारांचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नवीन रणनीती

कर्जत प्रतिनिधी | शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीला कर्जत जामखेड मतदारसंघातून सामोरे जाणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या मतदारसंघात त्यांचा विजय सोपा नसणार आहे. कारण या मतदारसंघात त्यांना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्ये कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या शक्यतेवर विजयी होणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगणे सध्या कठीण … Read more