‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर

२०१६ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये देशविरोधी नारे लावण्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी तेथील विद्यार्थ्यांचा तुकडे-तुकडे गॅंग असा उल्लेख करायला सुरुवात केली. भाजपच्या प्रत्येक प्रचारसभेत जेएनयुतील त्या कथित घटनेचा उल्लेख करत येथील विद्यार्थ्यांची तुकडे-तुकडे गँग कशी देशविरोधी हे ठसवण्याचा प्रयन्त भाजपचे शीर्ष नेते नेहमीच करताना दिसतात. मात्र, याच तुकडे-तुकडे गॅंगच्या अस्तित्वाबद्दल सरकारने घुमजाव केला केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे-तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नाही, असं स्पष्टीकरण आरटीआय अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

अंघोळीस अडथळा येवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी मी भरणार : जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थळाला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाल्याचे दिसले. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची थकीत पाणीपट्टी आपण भरणार असल्याचे बोलले आहे. कारण मुख्यमंत्र्यांना अंघोळ करायला आणि तोंड धुण्यास उशीर झाला तर सगळ्या कामाला उशीर होईल असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी … Read more