सांगली जिल्ह्यात उद्यापासून सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन ः जयंत पाटील

Jayant patil

सांगली | महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने काल सोमवारी  ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचा निर्णय महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला होता. मात्र आज मंगळवारी जिल्ह्याचीच कोरोनामुळे परिस्थिती चांगली नसल्याने बुधवार 5 मे ते मंगळवार 11 मेपर्यंत सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या काळात … Read more

भटक्या कुत्र्यावर तलवारीने हल्ला, तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

crime

सांगली | सांगलीतल्या संजयनगर परिसरातील झेंडा चौक येथे भटकी कुत्री त्रास देत असल्याच्या कारणातून तरुणाने तालवारीनेच चक्क कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केले. या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास हि बाब आली. सदरची घटना १ मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चिन्मय पार्क रोडवरील सोनार मळा समोर घडली. या प्रकरणी पोलीस शिपाई मोहन माळी यांनी … Read more

लहान मुलांच्या खेळण्यावरुन दोन कुटुंबात तुफान हाणामारी ः एकाचा हृदयविकाराने मृत्यू

Crime

सांगली | शहरातील गवळीगल्ली परिसरात राहणाऱ्या लहान मुलांमध्ये खेळण्यावर शनिवारी सायंकाळी वाद झाला. हा वाद त्या-त्या मुलांच्या कुटुंबीयांपर्यंत जाऊन पोहोचला. यात त्या दोन मुलांचे कुटुंबीय आमने-सामने आले आणि तुफान राडा झाला. यामध्ये झालेल्या मारहाणीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने सिराज बाबासाहेब अत्तार यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. … Read more

आर. आर. आबांच्या मुलाला ऑक्सिजनसाठी अजितदादांचा मध्यरात्री फोन 

सांगली | रात्रीच्या साडेबारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलाला फोन केला. सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टॅंकर पाठवला आहे, स्वतः सांगलीला जाऊन तो उतरुन घे असा निरोप रोहितला फोनवरून मिळाला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी लगेचच सांगली गाठली. सांगली येथे २३ जंबो टॅंकरसह दोन ड्यूरा ऑक्सिजन … Read more

लस घेतली एक अन् पैसै दहा लसींचे… राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहीती

सांगली | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनी कोरोनाचा पहिला डोस पैसे देवून घेतला. परंतु मुलांगा प्रतिक यांने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यासाठी एक मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी एक डोस घेतला मात्र, दहा लसींचे पैसे दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांच्याकडे जयंत पाटील यांनी लस घेतल्यानंतर … Read more

ग्रामिण भागातील तरुण – तरुणी ‘इथे’ बनवतायत कोरोनावर औषध; पृथ्वीराज चव्हाणांनी दिली भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील ईसरा (ISERA) बायोलॉजिकल या कंपनीत कोरोनावर औषध बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामिण भागातील तरूण- तरूणी करत असलेल्या संशोधनाच्या या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच भेट दिली आहे. ईसरा बायोलाॅजिकल ही कंपनी कोव्हीडवर औषध तयार करण्याचे संशोधन करत असल्याची माहीती पृथ्वीराज चव्हाण … Read more

धक्कादायक ! नवजात अर्भक फेकले नाल्यात; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

सांगली | शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या चांदणी चौक येथील अप्पा कासार झोपडपट्टी येथील एका नाल्यात चार महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक आढळले. परिसरातील नागरिकांनी मृत अर्भक नाल्यात पडल्याचे पहिले, त्यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस, महापौर आणि आयुक्त तातडीने दाखल झाले. पोलिसांनी अर्भकाला बाहेर … Read more

‘अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला काहीच सापडले नसेल’ – जयंत पाटील

सांगली | अनिल देशमुख यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लावला आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर केला आहे. अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला शंभर टक्के काहीच सापडले नसेल, असे महत्त्वाचे विधानही पाटील यांनी केले. देशात आणि राज्यात कोविडमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावरून लक्ष हटवण्याचे केंद्रातील भाजप … Read more

वादळी वारा व पावसाने वीज अंगावर पडून महिला ठार

सांगली | जत शहरातील विठ्ठलनगर येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज कोसळून तुळसाबाई यशवंत डोंबाळे या ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. जत शहरात रविवारी दुपारी 3 च्या दरम्यान सदर घटना घडली. तुळसाबाई डोंबाळे या राहत असलेल्या विठ्ठलनगर पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंत मळ्यात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेल्या होत्या.अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस … Read more

शासकीय रुग्णालयातच रेमडीसीव्हीरचा काळा बाजार; मृत रुग्णाचे इंजेक्शन ३० हजारांना विकले

सांगली | जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच रेमडीसीव्हीर इंजेक्शनची मागणी देखील वाढत आहे. याचाच गैरफायदा उचलत अव्वाच्या सव्वा दराने गरजू रुग्णांना हे इंजेक्शन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सांगली पोलिसांनी केला आहे. जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनच काळ्याबाजाराने विकत असताना मिरज शासकीय रुग्णालयातील अधिपरीचारकासह एका खाजगी लॅब टेक्निशियनला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून … Read more