Satara News : व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणारे 4 जण जेरबंद; सापळा रचत LCB ची कारवाई

smuggling whale vomit

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणाऱ्या ४ जणांना सातारा LCB ने ताब्यात घेतलं आहे. संशय येऊ नये म्हणून हे आरोपी चक्क ऍम्ब्युलन्स मधून आले होते. मात्र LCB ने सापळा रचत सदर आरोपीना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांच्याकडून तब्बल ५ कोटी ४३ लाख १० हजार किंमतीची व्हेल माश्याची उलटी जप्त कऱण्यात आली … Read more

Phaltan News : चोरी, मारहाण, जनावरांची कत्तल; फलटणमध्ये 5 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

phaltan police station

सातारा प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत साताऱ्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी पाहायला मिळत. मात्र याच जिल्ह्यातील फलटण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेलं पाहायला मिळत आहे. फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दारूच्या नशेत मारहाण, फर्निचर दुकानात चोरी, … Read more

माय- लेकीच्या नात्याला काळिमा!! मुलीला देहविक्रीस भाग पाडणाऱ्या सावत्र आईसह एकावर गुन्हा दाखल

satara police station

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आई व मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आले आहे. एका सावत्र आईने अल्पवयीन मुलीला साडेतीन हजारासाठी देह विक्रीसाठी भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेसह एकावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर अल्पवयीन मुलीने याबाबत एफआयआर दाखल केला असून … Read more

Satara News : चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद!! 18 गाड्यांसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल सातारा गुन्हे शाखेकडून जप्त

satara crime vehicle robbery

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून १,१५,००,०००/- रुपये किमतीची १० चारचाकी वाहने आणि इतर तीन आरोपींच्याकडून ३,२०,०००/- रुपये किमतीच्या ८ चोरीच्या मोटार सायकल असा एकूण ३,१८,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्याची रेकॉर्डब्रेक कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. याप्रकरणी तब्बल ७ जणांना पोलिसानी अटक केली आहे. याबाबतची अधिक … Read more

पोटच्या मुलानेच केला बापाचा खून; लाकडी दांडक्याने मारहाण करत घेतला जीव

karad murder

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचा खून केल्याची खळबळजनक घटना कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली या गावात घडली आहे. रागाच्या भरात मुलाने बापास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कराड तालुका पोलिसात खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेतलं आहे. मुलाच्या आणि वडिलांच्या भांडणातून मुलाने वडिलांना … Read more

अवैध बनावट दारू वाहतुकीवर कारवाई; 13 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त

Action on Illegal Liquor Traffic in karad

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा भरारी पथकाने कर्नाटकवरून मुंबईला जाणाऱ्या बेकायदा कर्नाटक बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 13 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कराड शहराच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे सदरची कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर विभाग … Read more

अनैतिक संबंधाचा संशय; तिघे थेट घरी घुसले, मारायला गेले एकाला अन् घडलं भलतंच

crime murder

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मुंजवडी (ता. फलटण) येथील पवारवस्तीत घराशेजारील महिलेशी अनैतिक संबधाच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत एका महिलेचा खून झाला. सीताबाई किसन सस्ते (रा. पवारवस्ती, मुंजवडी, ता. फलटण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची तक्रार प्रमिला सोमनाथ सस्ते (रा. पवारवस्ती) यांनी फलटण पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, संशयितांपैकी तानाजी घुले यास पोलिसांनी ताब्यात … Read more

धक्कादायक!! जेवणासाठी मटण दिलं नाही म्हणून ढाबाचालकास मारहाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॉटेलवर जेवायला गेल्यांनतर मटण दिले नाही नाही म्हणून ढाबा चालकास मारहाण केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील महाबळेश्वर येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्ग ढाब्यावर ही घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन करवले, राहुल करवले, शुभम काटकर, महेश सावंत … Read more

मुलानेच केला बापाचा खून, कराड तालुक्यातील घटना; कारण वाचून तुम्हांलाही बसेल धक्का

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील जखीणवाडी येथे घडली आहे. व्यसनी मुलाला दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने पित्याचा डोक्यात पार घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. जखिणवाडी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामागे हा खून करण्यात आला. शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय- 70) असे खून झालेल्या पित्याचे … Read more

Satara News : जादूटोणा करणारे मांत्रिक पोलिसांकडून जेरबंद; मोबाईल रेकॉर्डिंगमुळे अघोरी कृत्याचा पर्दाफाश

satara jadutona

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील सुरूर येथील धावजी पाटील मंदीरात घडलेल्या जादूटोणा प्रकरणातील आरोपीना जेरबंद करण्यात तसेच अन्य 2 अल्पवयीन मुलींच्या गुन्हयातील अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात भुईंज पोलीसांना यश आले आहे. याप्रकरणातील आरोपी हे फरार झाले होते मात्र त्यांना पकडण्यात भुईंज पोलिसाना यश आलं आहे. सुरूर येथे 25  फेब्रुवारीला धावजी पाटील मंदीरात संध्याकाळी … Read more