शिवरायांचा अश्वारूढ पुतळा मध्यरात्री शहरात दाखल

Shivaji Maharaj

औरंगाबाद – शिवप्रेमींच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काल मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शहरातील क्रांती चौकात दाखल झाला आहे. महापालिका आणि पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली. शिवप्रेमींची गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून चौथऱ्यावर पुतळा कधी बसवायचा याचा मात्र निर्णय घेण्यात आलेला नाही. मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची … Read more

छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा; अमोल कोल्हेंनी शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ उभारण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत. देशाच्या उत्तरी भागात जम्मू … Read more

संकल्पपूर्ती : किल्ले वसंतगडावर बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण, लोकार्पण सोहळा उत्साहात

कराड | किल्ले वसंतगडावरील पश्चिम दरवाज्याच्या बाजूकडील बुरुजासह तटबंदीचा काही भाग अतिवृष्टीमुळे ढासळला होता. त्याची डागडुजी व पुनर्बांधणी करून संवर्धन करण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी केला होता. तो संकल्प पूर्णत्वास नेत बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण करून नुकताच त्याचा दुर्गार्पण सोहळाही उत्साहात संपन्न झाला. या दुर्गार्पण सोहळ्यासाठी गडावर जमलेल्या शेकडो दुर्गसेवकांनी छत्रपती शिवाजी … Read more

क्रांती चौकातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा ‘या’ तारखेला येणार

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास साठीचा चौथऱ्यावर काल स्लॅब टाकण्याचे काम करण्यात आले. 15 जानेवारीपर्यंत छत्रपतींचा पुतळा पुणे येथून शहरात येणार असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी च्या चौथऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या उंचीच्या समांतर चौथा याची … Read more

म्हणुन वासोटा किल्ला पर्यटकांसाठी ‘हे’ तीन दिवस राहणार बंद

Vasota Fort

सातारा : महाराष्ट्रभरातील ट्रेकर्ससाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला वनदुर्ग वासोटा किल्ला ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी पर्यटनासाठी बंद राहणार असल्याची माहिती बामणोली वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली. नववर्ष स्वागत व सरत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता दरवर्षी तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने नवा वाद उफाळणार??

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोटबँक तयार केली असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर स्पष्टीकरण देतानाही नव्या वादाला तोंड फुटणारं वक्तव्य केलं आहे. ‘मी म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची वोटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही … Read more

पुरंदरेंच्या अस्थिला चंदन आणि राख लावून शिवाजी महाराजांच्या समाधीला लावण्याचा प्रयत्न; राष्ट्रवादीकडून पर्दाफाश

रायगड | किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या मानवी अवशेष असलेल्या हाडाला राख आणि चंदनामध्ये मिसळून महाराजांच्या समाधीला लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही गोष्ट घडल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात पुण्यातील काही लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य युवती सरचिटणीस पूजा झोळे व सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले … Read more

बिपीन रावत यांचे छत्रपती घराण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते; संभाजीराजेंकडून जुन्या आठवणींना उजाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला आणलं जाणार आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “जनरल बिपीन रावत हे … Read more

महाराष्ट्राला अजून शिवाजी महाराज कळालेले नाहीत – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी एका कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्याला शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतंच आम्हाला शिवचरित्र माहिती आहे. आज आपल्याला शिवाजी महाराज फार थोडे कळाले आहेत, असे मत व्यक्त केले. पद्मविभूषण शिवशाहीर … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीराव पेशव्यांसोबत; कुबेरांना नेमकं काय साध्य करायचं आहे?

Shivaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव आज सातासमुद्रपार केला जातोय. मात्र त्या छत्रपतींची तुलना बाजीराव पेशव्यासोबत एका पुस्तकात करण्यात आली आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहे. त्यांनी सदर पुस्तकातील तुलनात्मक केलेल्या उल्लेखाचा मजकूर ट्विट करून याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना … Read more