दुसऱ्या दिवशीही एसटीच्या वतीने खासगी शिवशाही रस्त्यावर

shivshahi

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रशासनाने शुक्रवारपासून खासगी शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी उतरवली आहे. शनिवारी मात्र नऊ शिवशाही बस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या. शुक्रवारी दोन बस धावल्या होत्या. या दोन दिवसात एक लाख 77 हजारांचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत पडले आहे. दरम्यान, शनिवारी 19 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. एसटी … Read more

एसटीनेच सुरू केली खासगी बसने प्रवासी वाहतूक

ST Bus

औरंगाबाद – कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात एसटी महामंडळानेही आता कंबर कसली आहे. आता खासगी शिवशाही सुरु करण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. बारा) पुणे शहरासाठी दोन खासगी शिवशाही बंदोबस्तात रवाना करण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली नाही, त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संपाला दहा दिवस होत आहेत. सुरवातीला मागे घेतलेला संप … Read more

साताऱ्यात एसटी स्टॅंडवरील शिवशाही बस पेटवणारा तरुण ताब्यात

सातारा । साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला आगीच्या हवाली करणाऱ्या तरुणाला पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाने एसटी स्टॅंडवर उभ्या असलेल्या बसला आग लावली होती. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर ५ बस गाड्यांनीही पेट घेतला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पेटलेल्या बस गाडया विझवल्या. तरूणाने लावलेल्या आगीत सहाही शिवशाही … Read more

पसरणी घाटात शिवशाही बस- ट्रॅव्हल्सचा अपघात,तब्बल ५० प्रवासी जखमी झाल्याची भीती

साताऱ्यामधील वाई आणि महाबळेश्वर मार्गावर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये शिवशाही बस आणि खासगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ४० ते ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शिवशाही बस-ट्रकचा भीषण अपघात

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी मेहेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरबिड नजिक महामार्गावरील तळेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला.