राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करण्या संदर्भात शिक्षण विभागाकडून विचार केला जात असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 … Read more

आंदोलन करताय; कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सामान्यांसाठी लोकल सुरु करावी या मागणीसाठी भाजपच्यावतीने नुकतेच रेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी मुंबईत भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईला लोकलचा विषय काढत कोरोना हा काही सरकार मान्य कार्यक्रम नाही, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल … Read more

आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं ही राज्यात परिस्थिती; चित्रा वाघ यांची टीका

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेवरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडला. यावरून एकच गोष्ट लक्षात येतेय की, आंधळ दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं ही राज्यात परिस्थिती झाली असल्याची … Read more

मंदिरं बंद ठेवून बार सुरू करणं हे सरकारचं धोरण; सदाभाऊ खोत यांची टीका

sadabhau khot uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचा मंत्रालयाच्या उपहारगृहामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण मंत्रालय हादरून गेले. यावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारसाठी दारूच्या बाटल्या सापडणे हि गोष्ट काही नवीन नाही. मंदिर बंद ठेवून बार सुरू … Read more

आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारचाच; केंद्राकडे बोट दाखवू नका; विनायक मेटे यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासंबंधी विधेयक आज लोकसभेत मांडन्याय आले आहे. या विधेयकामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार मिळणार आहे. तर एससीबीसी प्रवर्ग ठरवण्याचे अधिकारही राज्यांना मिळणार आहेत. या विधेयकावरून व मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारला तिला लगावला आहे. मराठा आरक्षणाचा अधिकार हा राज्यसरकारचंच असून त्यांनी आता केंद्राकडे बोट … Read more

अकरावी प्रवेश सीईटीसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार अर्ज

SSC student

औरंगाबाद | राज्य सरकारने यावर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्य मंडळामार्फत 21 ऑगस्टला राज्यभरात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. सामायिक प्रवेश परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 10 हजार 168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन द्वारे निकाल जाहीर झाला. विभागाचा निकाल 99.96 टक्के जाहीर झाला. यातच राज्य … Read more

रेल्वे प्रवासाच्या मुभाबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून ठाकरे सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची माहिती दिली असून दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाबाबत दोन तर तीन दिवसात निर्णय घेतला जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. लसींचे दोन डोस घेतलेल्या … Read more

आता तरी राज्य सरकारला जाग येणार आहे का?; दरेकरांचा खोचक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून ठाकरे सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “लसीचे दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी यावरून सरकारला न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी आता तरी राज्य सरकारला जाग … Read more

हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची राज्य सरकारवर टीका

Atul Bhatkhalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. त्यांच्यानंतर आज भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुण्यामधील पॉजिटिव्हीटी रेशो हा 4 टक्केपेक्षा ही खाली असताना राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचे सांगत … Read more

आरक्षण द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा; जबाबदारी झटकू नका; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळ समितीकडून मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागास प्रवर्ग ठरवून देण्याचे अधिकार राज्यांना मंजुरी दिल्यामुळे आता आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा गैरसमज आहे असे म्हंटले होते. यावरून भाजप विरोधी पक्षनेते … Read more