एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

‘भाकप’ तर्फे कोल्हापूर उत्तरसाठी उमेदवार जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतीशचंद्र कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार आज जाहीर करण्यात आला आहे. युती सरकारने शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, दलित महिला आणि असंघटित कामगार यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलं आहे. ‘विरोधी पक्ष कमकुवत ठरल्याने सक्षम पर्याय म्हणून भारतीय … Read more

उदयनराजेंना मोठा धक्का ; सातारा लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत नाहीच

नवी दिल्ली | आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या अपेक्षे प्रमाणे साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकी सोबत लागावी असे त्यांना वाटत होते. मात्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होताना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक मात्र लागली नाही. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे चाहत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. … Read more

माझ्या मनातला जनअभिव्यक्त जाहीरनामा – प्रा. अमीर इनामदार

प्रा. अमीर मुमताज सलीम इनामदार | बदलत्या सामाजिक परिस्थितीत मानवी नातेसंबंधांमधील सलोखा कायम राखण्यासाठी अनेक जण आपापल्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. हे नातेसंबंध केवळ जैविक असतील असं नाही, यामध्ये राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचाही अंतर्भाव असतोच. देशाच्या समोरील मुख्य समस्यांमध्ये बेरोजगारी आणि दारिद्र्य यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. अशावेळी ‘कौशल्य’ हा शब्द जडजंबाळ न वाटता, … Read more

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सांगलीमध्ये दाखल झालेली आहे. इस्लामपूर या ठिकाणी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या महाजनादेश यात्रेचे जल्लोषात स्वागत केले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात ही जनादेश यात्रा जाणार असून यासाठी भाजपाकडून जय्यत तयारीही करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सुरू असलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झालेली आहे. इस्लामपूर येथे … Read more

मुख्यमंत्री फडणवीस, लोणीकरांच्या भाषणातून स्वबळाने लढण्याचे संकेत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या तिन्ही सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भाषणांमधून स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वतंत्र लढते की काय अशा चर्चां सुरु झालीय. परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत पैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता तीन जागा युतीच्या … Read more

ठरलं! उदयनराजे अमित शहांच्या उपस्थितीत ‘या’ दिवशी करणार भाजपात प्रवेश

सतारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आजपर्यंत निष्ठावंत समजले जाणारे, ज्यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, जनतेने अपार प्रेम केले. छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या भाजपप्रवेशाची खास तयारीदेखील झाली असल्याचे कळते. येत्या १ ते ५ सप्टेंबर या काळात उदयनराजे भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होऊ … Read more

राणेंना भाजपमध्ये घेतल्यास आम्ही शिवसेनेत जाणार ; भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जर राणेंचा भाजपा प्रवेश झाला, तर कोणता झेंडा हाती घ्यायचा? असा प्रश्न या पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘राणेंना त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करायचा आहे’ … Read more

राष्ट्रवादीचे नेते शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादीचे युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य शरद लाड शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांची सेनेच्या एका बड्या मंत्र्यांशी गोपनिय बैठक झाली असून प्राथमिक चर्चा केली आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येत असल्याने लाड हे सेनेमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात होवू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा … Read more

सांगली आणि जत मध्ये भाजपात बंडखोरी ?

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  सत्ताधारी व विजयाची सर्वाधिक संधी म्हणून भाजपकडे इच्छुकांचा मोठा प्रवाह येत असून सांगली व जत मतदार संघात बलाढ्य इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्यामुळे या ठिकाणी जोरदार चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी बंडखोरी होण्याचे संकेत आतापासूनच प्राप्त होऊ लागले आहेत. आ.विलासराव जगताप यांच्या विरोधात सभापती तम्मनगौडा रवी, डॉ.रविंद्र आरळी … Read more