वादग्रस्त भाजपा आमदार राजु तोडसाम यांचा ‘पत्ता कट’  

यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ जिल्ह्यातील अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आर्णी – केळापूर विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार राजु तोडसाम यांचा विधानसभेसाठी पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपाची पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत तोडसाम यांच्या जागी आता भाजपाचे माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे यांची विधानसभेसाठी वर्णी लागली आहे. आमदार तोडसाम यांची कारकीर्द वादग्रस्त राहिल्यामुळे … Read more

राहुल कुल रासप कडूनच विधानसभा निवडणूक लढणार

पुणे प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीत दौंड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले हॊते. सोबतच भाजपचे स्थानिक कार्यकर्ते कुल हे भाजपच्याच तिकिटावर लढणार असल्याचा डंका वाजवत होते. अखेर या चर्चेला आता स्वतः राहुल कुल यांनीच पूर्णविराम दिला. ‘मी रासप कडूनच निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी … Read more

पाथरी विधानसभा मतदार संघाचा इतिहास काय सांगतो..

परभणी प्रतिनिधी। ऑक्टोबर मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाथरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दोन वेळा सुरुंग लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक वेळ अपक्ष यशस्वी झालेले आहेत. १९९० पासून मतदारसंघात सलग ३ वेळा शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या रूपाने हॅट्रिक केली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विद्यमान आमदार … Read more

निवडणुकीतील गैरव्यवहारांची नागरिक देणार माहिती

अमरावती प्रतिनिधी। अमरावती विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी माहिती देण्याच आवाहन प्रधान प्राप्तीकर संचालक कार्यालयाचे उपसंचालक अभय नन्नावरे यांनी केले आहे. लोकशाहीच्या हा उत्सव लोकशाही मार्गाने पार पडावा म्हणून नागरिकांचा ही यांत सहभाग असावा या दृष्टीने हा निर्णय घेणार आल्याचे समजते आहे. काळ्या पैश्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी प्राप्तीकर विभागाच्या अन्वेषण … Read more

शिराळा विधानसभा मतदारसंघ लढवणारच- सम्राट महाडिक

सांगली प्रतिनिधी। शिराळा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. तिकीट मिळाल तर ठिक अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा माघार नाही. असा इशारा सम्राट महाडीक यांनी दिला. कासेगाव येथे वनश्री नानासाहेब महाडिक प्रेमींनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याप्रसंगी सम्राट महाडीक बोलत होते. वाळवा तालुक्यातील ४८ गावातील नानासाहेब महाडीक प्रेमींचा प्रचंड मोठा जनसागर … Read more

राहुल बोन्द्रे यांच्या भाजप प्रवेशाला चिखलीत भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

बुलडाणा प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय खलबतांनी जोर पकडला आहे. जो तो आपली जागा शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात असून विचारधारा पक्षनिष्ठा या सगळ्यांना फाट्यावर मारत अनेक नेते भाजप सेनेत प्रवेश करत आहेत. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या इनकमिंग मुळे निष्ठावंत मात्र यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. अशाच … Read more

सांगली जिल्ह्यात भाजप-सेना युतीच्या संभ्रमाने वाढली चिंता

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे, जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र युती झाल्यास सेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या वाट्याच्या चारही जागा ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपने लढविण्याचा निर्धार करीत रणनिती … Read more

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वंचित सोबत जाणार?

कोल्हापूर प्रतिनिधी। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन नव्या राजकीय घरोब्याची तयारी सुरू केली आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत खलबते झाली. मात्र, चर्चेविषयी माहिती देण्यात आली नाही. इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तीन मतदारसंघात आवाडे गटाची लक्षणीय ताकद आहे. त्या … Read more

सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबरच

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचाली आता गतीमान होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणेच २७ सप्टे़बरला लोकसभा पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होईल. २१ आँक्टोबरला मतदान व २४ आँक्टोबरला मतमोजणी होईल. या निर्णयामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाला … Read more

‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’- विनायक राऊत

रत्नागिरी प्रतिनिधी। रत्नागिरी जिल्ह्यातील महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प होऊ शकतो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आज ‘नाणार रिफायनरी प्रकल्प’ विरोधी शेतकरी , मच्छिमार संघटनेची तारळ येथे सभा  झाली. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची उपस्थिती या सभेला उपस्थिती होती. यावेळी ‘आमचं नातं लाल मातीशी, मग आम्हाला रिफायनरी नको,  दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री … Read more