मुंबई : हॅलो महाराष्ट्र – BCCI ने बुधवारी 26 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. या सीरिजसाठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. राहुल त्रिपाठीलाही संघात स्थान मिळाले आहे. हार्दिक (Hardik Pandya) प्रथमच भारताचे नेतृत्व करणार आहे.
Hardik Pandya to lead the Indian team in the two-match T20I series against Ireland later this month: BCCI pic.twitter.com/4wHdnqqgML
— ANI (@ANI) June 15, 2022
या अष्टपैलू खेळाडूने (Hardik Pandya) 15 सामन्यांमध्ये 487 धावा करत IPL 2022 मध्ये GT चे नेतृत्व केले होते. त्याने या स्पर्धेदरम्यान आठ विकेट्स घेतल्या. त्याने (Hardik Pandya) आपल्या नेतृत्वात आयपीएलमध्ये गुजरातला चॅम्पियन बनवले. सध्या तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेसाठी संघाचा भाग आहे. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांची देखील या सीरिजसाठी निवड झाली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यात अनुक्रमे 26 जून आणि 28 जून रोजी डब्लिनमध्ये दोन T20 सामने होणार आहेत.
भारताचा T20 संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार)(Hardik Pandya), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवी अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
हे पण वाचा :
आदित्यजी लवकर तुमचे शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सूनबाई आम्हाला मिळो; भाजप नेत्याने दिल्या शुभेच्छा
SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा
LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ???
ठाकरे सरकार टक्केवारी, वसुलीमध्ये खूश पण आम्ही झोपू देणार नाही…; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली