तेलंगणा : वृत्तसंस्था – सोशल मीडियात केलेल्या एका पोस्टमुळे तेलंगणामध्ये तुफान राडा झाला आहे. तेलंगणाच्या आदिलाबादमध्ये शनिवारी रात्री सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात यामुळे तणाव निर्माण झाला होता. या पोस्टमुळे एका विशिष्ट समुदायातील लोकांनी वन टाऊन पोलीस स्टेशनच्या समोर निदर्शनं करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र लोक ऐकायला तयार नव्हते त्यामुळे नाईलाजाने पोलिसांना जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज (Stick charge) करावा लागला. ज्या व्यक्तीने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे हे सगळं प्रकरण झालं, त्याच्यवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
#WATCH | Adilabad, Telangana: Police resort to lathicharge to disperse the crowd that was protesting in front of One town police station over a social media post pic.twitter.com/5rFutwLRi5
— ANI (@ANI) June 11, 2022
सोशल मीडियामध्ये करण्यात आलेल्या पोस्टमुळे काही लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. यामुळे आम्ही याप्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवून घेत त्याला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे अशी माहिती राज्याचे पोलीस अधिक्षक डी. उदय कुमार रेड्डी यांनी दिली आहे.
शांतता बाळगण्याचं आवाहन
या सगळ्या तणावामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. कायदा कुणीही हातात घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज (Stick charge) करण्यात आला, असेदेखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे पण वाचा :
काळाचा घाला! डॉक्टरांकडे उपचारांसाठी जात असताना सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SA T-20 : क्रिकेट मॅचच्या दरम्यान स्टेडिअममध्येच एकमेकांबरोबर भिडले फॅन्स
सातारा जिल्ह्यात भरारी पथकाकडून 2 कोटीचे बोगस बियाणे जप्त
…लेकिन बच्चन तो बच्चन है; राज्यसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
महाविकास आघाडीची बुद्धी गुडघ्यात, त्यांनी जरा… ; चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका