हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना मोठया प्रमाणावर व्हेंटिलेटर्सची गरज भासत आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांनी व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीला वेगाने सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्कने एफडीएने मंजूर केलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोफत पुरवठा करण्यास आपली कंपनी तयार असल्याचे म्हटले आहे.
टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील भागांमध्ये व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत असे इलॉन मस्कने टि्वटमध्ये म्हटले आहे. पण त्यासाठी त्याने काही अटी ठेवल्या आहेत. तुम्हाला व्हेंटिलेटर्सची तात्काळ आवश्यकता असली पाहिजे व भविष्यात वापरण्यासाठी तुम्ही ती स्टोअर करून ठेवायची नाहीत अशा दोन अटी इलॉन मस्कने ठेवल्या आहेत.
“एफडीएने मंजुरी दिलेली अतिरिक्त व्हेंटिलेटर्स आमच्याकडे आहेत. टेस्लाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जगभरातील सगळ्या हॉस्पिटल्समध्ये आम्ही ती व्हेंटिलेटर्स पोहोचवू. व्हेंटिलेटर व त्याच्या वाहतुकीसाठीआम्ही एकही पैसा आकारणार नाही. पण एकच अट आहे, तुम्हाला त्या व्हेंटिलेटरची तात्काळ गरज असली पाहिजे व तुम्ही ती गोदामात ठेवायची नाहीत” असे मस्कने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
स्पेसएक्सने बनवलेल्या अवकाश यानात लाईफ सपोर्ट सिस्टिम असते.व्हेंटिलेटर्स बनवणे काही कठिण काम नाहीये.मात्र ते लगेच बनवता येत नाही असे मस्क म्हणाले होते. न्यू यॉर्कमधील एका हॉस्पिटलला टेस्लाने ४० व्हेंटिलेटर्स मोफत दिले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता