मोदींनी चहा विकला की नाही याप्रमाणे त्यांची डिग्री सुद्धा रोमांचक रहस्यपट

0
129
raut modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याची मागणी केली म्हणून अरविंद केजरीवाल यांना गुजरात कोर्टाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी चहा विकला की नाही याप्रमाणे त्यांची डिग्री सुद्धा रोमांचक रहस्यपट आहे. तुमची इयत्ता कंची?” असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जातो. मुळात यात लपविण्यासारखे काय आहे? असं म्हणत सामना अग्रलेखातून मोदींच्या डिग्रीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल –

मोदींच्या बोगस डिग्रीचा विषय सध्या गाजतो आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी यांनी जाहीरपणे एका मुलाखतीत व भाषणात सांगितले होते की, “मी शिकलेलो नाही. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही” व नंतर अचानक मोदी यांची एमएची पदवी (Entire Political Science) समोर येते व अमित शहा दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन नदीची डिग्री फडफडवून दाखवतात. त्यामुळे मोदींची डिग्री खरी की खोटी, यावर लोकांनी शंका घेतली तर त्यात मोदींची बदनामी कशी? पंतप्रधानाची डिग्री सार्वजनिक करा अशी याचिका रविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात करताच न्यायालयाने केजरीवाल यांनाच 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यामुळे मोदीची जास्तच बदनामी झाली व ती गुजरातच्या न्यायालयाने केली. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

पण मोदी यांना “तुमची इयत्ता कंची?” असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जाते. मुळात यात लपविण्यासारखे काय आहे? मोदी जी ‘डिग्री’ दाखवत आहेत ती बनावट आहे. गुजरात विद्यापीठाने जी डिग्री मोदींची म्हणून दाखवली त्यावर लिपी शैली’त Master लिहिले आहे, पण ती लिपी शैली’च 1992 साली आली व मोदींची डिग्री 1983 सालची आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच. आता त्याही पुढे जाऊ, मोदींनी 1979 साली बी. ए. केले. 1983 साली एम. ए. केले. मग 2005 साली त्यांनी का सांगितले की, “माझे काहीच शिक्षण झाले नाही. ” याचे उत्तर मोदींनी यायला हवे व कोणी त्यांच्या डिग्रीवर आणि शिक्षणावर प्रश्न विचारले की, हा माझी बदनामी सुरू आहे असे सांगणे म्हणजे ‘व्हिक्टीम कार्ड खेळण्यासारखेच आहे. मोदींनी गुजरातच्या स्टेशनवर चहा विकला की नाही? या रहस्याप्रमाणेच मोदींची डिग्री हासुद्धा एक रोमांचक रहस्यपट आहे. देशाला ‘अडाणी’ पंतप्रधान नको ‘अशी पोस्टर्स दिल्लीत लागताच पोलिसांनी ती पोस्टर्स फाडली व पोस्टर्स लावणाऱ्यांना अटक केली, देशाला शिकलेला पंतप्रधान हवा असे बोलणे यात मोदीची अशी काय बदनामी झाली? मोदीकडे तर एक रहस्यमय डिग्री आहे व Entire Political Science हा कोणी कमीच ऐकलेला विषय घेऊन त्यांनी एम. ए. केले. त्यामुळे ते ‘अनपढ़’ अहित असे कसे म्हणावे? फक्त ते त्यांची डिग्री दाखवायला तयार नाहीत.

आज देश मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी, कृपी कायदे, नोटाबंदी अशा निर्णयांची किंमत चुकवीत आहे. देशातील शेतकरी, व्यापारी, तरुण वर्ग बरबाद झाला आहे. मोदीचे मित्र ‘अदानी’ यांच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. देशासाठी असे घातक निर्णय पतास्थान घेतात की कोणी नवी घेतात? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे आणि त्याचा खुलासा पंतप्रधानांची डिग्रीच करू शकते असं सामनातून म्हंटल आहे.

कोरोनासारख्या महामारीचे संकट आपल्या देशावरही आदळले तेव्हाही ‘बाळा वाजविणे, ‘ ‘पणत्या पेटविणे’ असे प्रकार जनतेला करायला सांगितले गेले. त्यामुळे कोरोना पळून जाईल असे हास्यास्पद दावे केले गेले. वास्तविक कोणताही विज्ञाननिष्ठ, सुशिक्षित राज्यकर्ता अशा गोष्टी करणार नाही, मात्र आपल्याकडे त्या झाल्या. त्यातूनही काही प्रश्न तेव्हा उपस्थित केले गेलेच होते. अशा सगळ्याच प्रश्नांवर मोदी यांनी त्यांची डिग्री दाखविणे हेच एकमेव उत्तर आहे, मात्र त्याऐवजी ते मौन बाळगत आहेत असं म्हणत मोदींच्या डिग्री वरून ठाकरे गटाने जोरदार निशाणा साधला आहे.