अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती.

तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची आई झाली आहे. अपहरणाचे आरोपी हे हिमाचल प्रदेश आणि बिहारमधीलच होते. आरोपींची टोळी मुलींचे अपहरण करून त्यांना विकायची. त्या टोळीमध्ये एक महीलासुद्धा होती.

अपहरण झाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी एसएसपी पासून ते डीजिपी पर्यंत विनंती केली पण पोलिस मुलीला शोधू शकले नाहीत. पोलिसांनी मुलगी स्वतः पळून गेली असेल असे सांगितले. पीडितेचा भाऊ मोबाईलवर लोकेशन शोधत राहिला. तेव्हा त्याला राजस्थानमधील दोऊसा येथे तिचे लोकेशन मिळाले. पोलिसांना घेऊन त्याने तिची सुटका करून आणली. तीन वर्षांमध्ये तिला विविध ठिकाणी विकले होते. शेवटी तिला 5 लाखात विकत घेऊन डोऊसामध्ये आणले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.